Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : ध्वजारोहणावरून वादावादी , अखेर यादीत बदल , जाणून घ्या कोण कुठे फडकावणार तिरंगा … ?

Spread the love

मुंबई : मंगळवारी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी आपल्या देशाचा ७६ वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचा स्वातंत्र्यदिन महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दरम्यान, या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्यात ध्वजारोहण करतात.दरम्यान १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण कोण करणार? याबाबत आराखडाही तयार करण्यात आला आहे.

राज्य सरकारने यातून मार्ग काढला असून कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण कोण करणार याची यादी जारी करण्यात आली आहे. पालकमंत्री पदाचा वाद टाळण्यासाठी राज्य सरकारने तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आहे. ज्या जिल्ह्य़ांमध्ये नाव नाही, तेथे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ध्वजारोहण केले जाईल.

महाराष्ट्र सरकारने यादी जाहीर केली. राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार आहे. भाजप, शिवसेना सरकार असताना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. अर्थात शिवसेनेत मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक होती, हे कारण आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये आला. अजित पवार यांच्यासह नऊ जण मंत्री झाले. परंतु वादामुळे पालकमंत्रीपदाचे वाटप केले गेले नाही. आता हाच वाद ध्वजारोहण समारंभाला बसला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाची यादी दोन वेळा बदलली आहे.

पुणे, रायगडचा वाद

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार इच्छुक आहेत. परंतु हा जिल्हा भाजपला हवा आहे. तोच वाद रायगडसाठी आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आमदार भरत गोगावले आपला वारंवार दावा करत आहेत. यामुळे १५ ऑगस्टसाठी ध्वजारोहणाची यादी तयार केली गेली, त्यात रायगडला जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार होते. पुणे शहरात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते.

पुन्हा यादी बदलली

पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी दुसऱ्यांदा यादी बदलली. जुन्या यादीनुसार पुणे येथे चंद्राकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. आता नवीन यादीनुसार चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार आहे. यामुळे पुण्यात ना चंद्रकांत पाटील, ना अजित पवार असा तोडगा काढला गेला आहे.

अजित पवार कुठे करणार ध्वजारोहण ?

अमरावतीत छगन भुजबळ ध्वजारोहण करणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून सुचवले गेले. परंतु हा निर्णय कायम राहिला. अजित पवार आता कोल्हापुरात ध्वजारोहण करणार आहे. रायगडसाठी आदिती तटकरे यांचा दावा होतो. परंतु त्यांना पालघर दिले गेले आहे.

अशी आहे यादी…

नागपूर – देवेंद्र फडणवीस
कोल्हापूर- अजित पवार
छगन भुजबळ- अमरावती
सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर
चंद्रकांत पाटील -रायगड
दिलीपराव वळसे-पाटील- वाशिम
राधाकृष्ण विखे-पाटील – अहमदनगर
गिरीष महाजन – नाशिक
दादाजी भुसे- धुळे
गुलाबराव पाटील- जळगाव
रवींद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत- रत्नागिरी
अतुल सावे- परभणी
संदीपान भुमरे- औरंगबाद
सुरेश खाडे -सांगली
विजयकुमार गावित-नंदुरबार
तानाजी सावंत- उस्मानाबाद
शंभूराज देसाई- सातारा
अब्दुल सत्तार -जालना
संजय राठोड- यवतमाळ
धनंजय मुंडे- बीड
धर्मराय आजम- गडचिरोली
मंगलप्रभात लोढा- मुंबई उपनगर
संजय बनसोडे- लातूर
अनिल पाटील- बुलढाणा
आदिती तटकरे- पालघर
इतर जिल्ह्यात जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!