Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता ..

Spread the love

मुंबई : पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी चर्चा महाराष्ट्रात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप गटातील काही नेत्यांनाही मंत्रिपद दिले जाऊ शकते.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या नावाचा समावेश होणार की नाही, याची उत्सुकता एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांमध्ये आहे. इतकेच नाही तर अनेक आमदार पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहेत. काही आमदार उद्धव ठाकरे सेनेच्याही संपर्कात असून मंत्रिपद न मिळाल्यास ते त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

म्हणून खाते वाटपास विलंब ..

एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या आमदारांमध्येही अस्वस्थता कमी नाही. त्यांना कोणते खाते  मिळणार याची चिंता आहे. या आमदारांना शपथ घेऊन आठवडा उलटून गेला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. अलीकडेच अजित पवार यांनी अर्थ मंत्रालय, ऊर्जा मंत्रालयासह अनेक महत्त्वाची खाती मागितली होती, मात्र त्यावर शिंदे गटाचा आक्षेप होता. त्यामुळे खातेवाटप थांबले आहे. आता दिल्लीतील भाजप हायकमांड याबाबत मंथन करत असल्याची बातमी आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मंत्र्यांच्या खात्यांचे वितरण आणि विस्तार होऊ शकतो.

आणखी १४ जणांना मिळू शकते संधी ..

सरकारमध्ये आणखी १४  मंत्री घेतले जाण्याची शक्यता आहे. या सरकारमध्ये सध्या भाजप, एकनाथ शिंदे सेना आणि नव्याने आलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गट असे तीन पक्ष आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांची संमती आणि नंतर भाजप हायकमांडकडून मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे.

दरम्यान आपल्याच काही मंत्र्यांच्या आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांच्या कामावर भाजप हायकमांड खूश नसल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत या लोकांकडून राजीनामे घेतले जाऊ शकतात. मग त्यांच्या जागी नवीन मंत्री आणले जाऊ शकतात आणि काही वाढवताही येतील. त्यामुळे  एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे.

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या ५०  आमदारांपैकी बहुतांश आमदार अजूनही मंत्री होण्याची प्रतीक्षा करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या काळातही मंत्री राहिलेले अनेक जण आहेत. अशा स्थितीत हे लोक मंत्री होणे हा आपला हक्क मानत असून संधी  मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदारांची मनधरणी

दरम्यान या विलंबामुळे शिंदे यांच्यासोबत गेलेले अनेक नेते  उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याने एकनाथ शिंदे गटावर दबाव वाढला आहे. राष्ट्रवादीचे सरकार येण्यापूर्वी शिंदे गटाच्या आमदारांना १२  ते १३  मंत्रीपदे मिळू शकतात, अशी चर्चा होती. पण आता अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या ९ आमदारांना मंत्रिमंदळत संधि दिल्यामुळे त्यांची शक्यता कमी झाली आहे. परिणामी  एकनाथ शिंदे यांना त्यांच्या समर्थकांची मनधरणी करणे कठीण जात असल्याचे वृत्त आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!