Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraaNewsUpdate : जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा घोटाळा आहे तरी काय ?

Spread the love

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करून भाजपासोबत सरकार बनवून वर्ष होत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत शिंदे – फडणवीस सरकारमध्ये चंचू प्रवेश केला आहे. याचे कारण देताना या ९ मंत्र्यांनी त्यांच्यावर पक्षाकडून अन्याय झाल्याचे सांगितलेले आहे परंतु ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे की अनेक वर्षापासून हे सर्व जण सत्त्तेचे लाभधारक आहेत त्यामुळे त्यांच्या कांगाव्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होत असल्याने भाजप अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकार प्रवेशानंतर ‘साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा पुन्हा चार्चत आला आहे. या बाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की , २३५ एकर जमीन, तसेच कारखाना, यंत्रे, इमारत बांधकाम इत्यादी मालमत्ता अवैधरित्या ताब्यात घेण्याचा घाट जरंडेश्वर शुगर मिल्स कंपनीने घातला. त्यासाठी मुंबईतील केवळ कागदोपत्री असलेल्या ओमकार ग्रुपच्या गुरू कमॉडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा वापर करण्यात आला. त्या कंपनीने कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन ती मालमत्ता खरेदी करून लगेचच जरंडेश्वर शुगरकडे दीर्घ भाडेपट्ट्याने दिली.

मनी लाँड्रिंगचा गुन्हा केल्याचे तपासातून स्पष्ट…

या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक), जरंडेश्वर शुगर आणि गुरू कमॉडिटीच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संगनमत व कटाचा तपास सुरू आहे . या आरोप पत्रात पुढे म्हटले आहे की , ‘जरंडेश्वर शुगर आणि गुरू कमॉडिटीच्या संचालकांनी शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकून आपल्या मर्जीप्रमाणे काम करण्यास भाग पडले. तसेच साखर कारखान्याच्या मालमत्ता अवैधरित्या कवडीमोल किंमतीत मिळवल्या. त्यामुळे त्यांनी पीएमएलए कायद्याच्या कलम ३ व ७०अन्वये मनी लाँड्रिंगचा गुन्हा केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

सहकारी बँकेकडून घेतले ८९ कोटींचे कर्ज

या घोटाळ्यातील पैशांचे जरंडेश्वर शुगर कंपनीतील लाभार्थी कोण, जरंडेश्वर शुगर आणि गुरू कमॉडिटीमधील संबंध, लिलावानंतर जरंडेश्वर कारखान्याच्या मालमत्ता या गुरू कमॉडिटीच्या मालकीच्या झाल्या असताना आणि कारखान्याच्या मालमत्तांचे मूल्य तज्ज्ञामार्फत १०३ कोटी रुपये निश्चित झालेले असताना जरंडेश्वर शुगरने सहकारी बँकांकडून तब्बल ८२६ कोटी रुपयांची कर्जे कशी मिळवली, अशा अनेक मुद्द्यांचा अधिक तपास सुरू आहे. कारखान्यात साखर साठा नसतानाही त्याच्या नावाखाली जरंडेश्वर शुगरने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ८९ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले.

गुरू कमॉडिटी ही केवळ फ्रंट कंपनी

दरम्यान गुरू कमॉडिटीने कारखान्याच्या सर्व मालमत्ता या जरंडेश्वर शुगरला वार्षिक अवघ्या १२ लाख रुपये दराने दीर्घ भाडेपट्ट्यावर दिल्या. तसेच काही कोटी रुपये अनामत ठेवीच्या नावाखाली घेतल्या. मात्र, त्यातील बहुतांश रक्कम नंतर जरंडेश्वर शुगरला परत दिली. त्यामुळे गुरू कमॉडिटी ही केवळ फ्रंट कंपनी असून कारखान्याच्या मालमत्तांची खरी मालकी जरंडेश्वर शुगरकडेच असल्याचे तपासातून स्पष्ट होते. या प्रकरणातील सर्व संशयितांची भूमिका तपासण्याचे काम सुरू असल्याने पुरवणी आरोपपत्रात तपशील देण्याची अनुमती ‘ईडी’ने आरोपपत्रात मागितली आहे.

विशेष न्यायालयाचे गंभीर निरीक्षण …

प्रथम दर्शनी ‘जरंडेश्वर शुगर कंपनीशी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व अन्य निकटवर्तीयांचा संबंध आहे आणि त्या निकटवर्तीयांनी साखर कारखान्याच्या मालमत्ता या कवडीमोल किंमतीत मिळवल्याचे प्रथमदर्शनी दिसते’, असे गंभीर निरीक्षण विशेष न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेताना आदेशात नुकतेच नोंदवले आहे. त्या पार्श्वभूमीवर, ‘ईडी’च्या भविष्यातील पुरवणी आरोपपत्रातून जरंडेश्वर घोटाळ्याचे आणखी तपशील उघड होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!