Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : या दोन्हीही खासदारांची शरद पवारांकडून राष्ट्रवादीतून हकालपट्टीचे ट्विट

Spread the love

मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी भाजप-शिवसेना सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या या आमदारांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादीने पहिले पाऊल उचलले आहे. या ९ जणांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, असे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवले आहे.

दरम्यान एकीकडे मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांवर कारवाईला सुरूवात झाली असतानाच राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून शरद पवार यांना पत्र पाठवले आहे. सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे सुप्रिया सुळे यांनी या पत्रात नमुद केले आहे.

शरद पवारांचे ट्विट

खा. सुप्रिया सुळे यांच्या या पत्रानंतर शरद पवारांनी लगेचच तटकरे आणि पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत आहे, असे ट्वीट शरद पवारांनी केले आहे.पक्ष प्रमुख शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे हे खासदार आहेत, यासोबतच प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादीचं कार्याध्यक्ष आणि तटकरे यांना पक्षाचं सचिव करण्यात आले होते.

सुप्रिया सुळे यांचे ट्विट

‘राष्ट्रवादीच्या ९ आमदारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लाऊन खासदार सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी पक्षविरोधी आणि पक्षाच्या घटनेविरोधी काम केले आहे. याशिवाय त्यांनी माध्यमांमध्ये वक्तव्यही केली. हे दोन खासदार आणि आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष आणि सदस्यांना विश्वासात न घेता ही कृती केली आहे,’ असे सुप्रिया सुळे या पत्रात म्हणाल्या आहेत. ‘या सगळ्यांनी पक्षाचा तसंच जनादेशाचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे भारतीय संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार यांच्यावर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!