AccidentNewsUpdate : देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या क्रूझरला भीषण अपघात, ६ ठार , १० जखमी

सोलापूर : देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. शिरवळवाडी येथील अक्कलकोट ते वागदरी जाणार्या रस्त्यावर सिमेंटचे कंटेनर व क्रूझरचा भीषण अपघात झाला. या अपघात सहा जण ठार झाले असून तर 10 गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अणूर (ता.आळंद, जि.कलबुर्गी) येथील भाविक नवस फेडण्याकरिता कर्नाटकातील अफझलपूर येथील भागम्मा देवी येथे जावून नवस फेडण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी परतीच्या प्रवासात गाणगापूर, अक्कलकोट येथे देवदर्शन करुन वागदरी मार्गे पुन्हा अणूरकडे जात होते. त्याच दरम्यान, शिरवळवाडीच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर पुलाशेजारील वळणावर कलबुर्गीहून सोलापूरकडे येणार्या कंटनेर क्र.एम.एच.12/युएम/7186 या गाडीने समोरुन येणार्या भाविकांच्या क्रूझर क्र.केए/35/ए/7495 गाडीला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की , क्रूझरला बसलेल्या या भीषण धडकेमुळे चालकासह सहा जणांचा जागीच ठार झाले. तर, 8 जण गंभीर जखमी झाले.इतर , दोन जण किरकोळ जखमी झाले. जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सर्व जखमी रुग्णांना सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे.
मयत आणि जखमींची नावे
अपघातात ठार झालेल्यांमध्ये 1) संगीता मदन माने (वय 35) रा. बेडगे ता . उमरगा, 2) सुंदराबाई भारतासिंग राजपूत (वय 55) रा अन्नुर ता.आळंद, 3) ललीता महादेव बग्गे (वय 50 रा अन्नुर), 4) साईनाथ गोविंद पुजारी (वय 10 रा अन्नुर), 5) रोहिणी गोपाळ पुजारी (वय 40 रा अन्नुर ता.आळंद) यांचा समावेश असून असुन एका मयत महिलेची ओळख पटली नाही. तर जखमींमध्ये सुनिल हणमंतराव पांचाळ (वय 50), सुमित पुजारी (वय 9), रेखा गोविंद पुजारी (वय 40), गोपाल चंद्रकांत पुजारी (वय 50), विठ्ठल हणमंत ननवरे (वय 35), अजित अशोक कुंदले (वय 30), भाग्येश अशोक कुंदले (वय 40), अशोक पुनदिले (वय 45), कोमल शामडे (वय 50), कल्पना अशोक कुंदले (वय 40) रा. सर्व अणूर (ता.आळंद, जि.कलबुर्गी) यांचा समावेश आहे.
अपघाताचे वृत्त समजताच सोलापूरचे ग्रामीण पोलिस अधीक्षक, अक्कलकोट उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, उत्तर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, तहसिलदार बाळासाहेब शिरसाठ यांनी भेट दिली. या अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेनासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.