Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Sharad Pawar Press Conference : लोकांना दोष देण्यात अर्थ नाही त्यांच्यापुढे पंतप्रधानांचा आदर्श आहे

Spread the love

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार  यांनी मीरा रोड येथील सोसायटीत बकरी आणल्यावरून रहिवाशांमध्ये झालेल्या वादावर भाष्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान स्वत: हात वर करून बजरंग बली की जय म्हणतात तेव्हा त्याचा परिणाम असाच होतो त्याचे दुष्परिणाम खालपर्यंत होणे साहजिक आहे. मीरा रोडच्या सोसायटीत नेमके काय घडले आणि घडले की नाही याची कल्पना नाही. पण तसे काही असेल तर त्या लोकांना दोष देण्यात अर्थ नाही. त्यांच्यापुढे खुद्द पंतप्रधानांचा आदर्श आहे, असा खोचक टोला पवार यांनी लगावला आहे. दरम्यान, राज्यातील महिला आणि मुलींवरील वाढत्या हल्ल्यावरुन आणि त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यात गेल्या सहा महिन्यात २४५८ मुली बेपत्ता आहेत आणि ही चिंतेची बाब असल्याचे शरद पवार म्हणाले.

१४ जिल्ह्यातून एकून ४४३४ मुली बेपत्ता असल्याची माहितीही शरद पवारांनी दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी बाष्कळ वक्तव्य न करता कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे असा सल्लाही शरद पवारांनी दिला. शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारला एक वर्ष झाले, अनेक प्रश्न समोर आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे. महिला आणि मुली यांच्यावर हल्ले होतायंत आणि दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होतेय ही चिंतेची बाब आहे. पुणे, ठाणे, सोलापूर आणि मुंबई मधील महापालिकेच्या क्षेत्रातली माहिती माझ्याकडे आहे. जानेवारी २०२३ पासून मुंबईतून ठाण्यातून ७२३ मुली, मुंबई ७२३ आणि सोलापूर ६७ हा असा एकूण जवळपास २४५८ मुली बेपत्ता आहेत अशी माहिती या पत्रकार परिषदेत दिली.

शरद पवार यांनी समान नागरी कायद्याच्या प्रश्नावरुनही केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. एकाच देशात दोन कायदे नको असे पंतप्रधानांनी म्हटल्याची माहिती आहे. त्यावर समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार सुरू आहे. शीख समाज, जैन आणि इतर समाजांची भूमिका काय आहे हे स्पष्ट व्हाव. शीख समाजाचे वेगळे मत असल्याचे माझ्या कानावर आले आहे. समान नागरी कायद्याला विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती आहे. कायदा आयोगाने सांगितल्याप्रमाणे सर्वांचे मत लक्षात घेऊन यावर निर्णय घ्यावे. शरद पवार पुढे म्हणाले की, समान नागरी कायदा लागू करण्याची बातमी सगळीकडे पसरवली जातेय, हे कुठल्यातरी महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष विचलित करण्यासाठी केले जातंय का हे पाहावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी यांचे आणखी घोटाळे बाहेर काढावेत, असे आवाहन केले होते. त्याला आज शरद पवारांनी उत्तर दिले. मोदींनी शिखर बँकेबाबत आरोप केले मात्र, शिखर बँक तर सोडाच, पण मी कुठल्याही सहकारी बँकेचा सदस्य नाही. या सहकारी बँकांकडून मी कधी कर्जही घेतलेले नाही. शिखर बँकेबाबत मागे एकदा तक्रार झाली होती. चौकशीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि भाजपाच्या काही लोकांची नावे आली. मोदींनी निराशेतून असा हल्ला केला असावा. अमेरिकेचा दौरा आणि भारतातील स्थिती पाहून ते निराश झाले आणि त्या निराशेतूनच त्यांनी असा हल्ला केला असावा, असे म्हणत शरद पवारांनी मोदींना टोला लगावला.

तसेच राज्यात गेल्या काही महिन्यांपासून दंगली घडवल्या जात असल्याचे शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, कोल्हापूर, संगमनेर आणि इतर ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगली ठरवून घडवल्या जात आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या गोष्टी केल्या जात आहेत का हे तपासले पाहिजे.

 


#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!