धक्कादायक ; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

जळगाव : धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथ बुधवारी अंगणात खेळत असतानाच अवघ्या दोन वर्षीय चिमुकल्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कार्तिक शशिकांत बडगुजर (वय 2) असे मयत बालकाचे नाव आहे.

Advertisements

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथिल शशिकांत बाबूलाल बडगुजर यांचा कार्तिक बडगुजर हा दोन वर्षाचा मुलगा आपल्या अंगणात खेळत असताना बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अंगणात खेळून झाल्यानंतर कार्तिक घरात आला व अचानक जमिनीवर पडला. हे पाहून कार्तिकचे आजोबा बाबूलाल बडगुजर यांनी नातवाला उचलले परंतु तो कोणतीही हालचाल करत नव्हता त्यामुळे त्यांनी त्याला तातडीने डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी लहान बालकाला तपासून मृत घोषित केले व हृदयविकाराने त्याचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. या बालकाचा अचानक मृत्यू झाल्याने पालकांना मोठा मानसिक धक्का बसला. बुधवारी दुपारी दोन वाजता मृत कार्तिकवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisements
Advertisements

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

धक्कादायक धक्कादायक

#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mahanayak news Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!