Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPNewsUpdate : धार्मिक मुद्द्यावरून अमित शहा यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांना डिवचले , राज्यात ४५ जागा मिळविण्याचा संकल्प

Spread the love

नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या नांदेड येथील महाराष्ट्रातील पहिल्याच जाहीर सभेत पुन्हा एकदा धार्मिक मुद्द्याला हात घालत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला बोल केला. तसेच पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली नसून एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचे नमूद केले. महाराष्ट्रातून ४५ जागा जिंकण्याचा संकल्प त्यांनी या सभेत जाहीर केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना अमित शहा म्हणाले की , ट्रिपल तलाकच्या निर्णयाने आपण सहमत अहात की नाही? मुस्लिम आरक्षण नको असे भाजपचे मत आहे याबद्दल ठाकरेंना काय वाटते आहे? समान नागरी कायदा यावा ही भाजपची भूमिका आहे. यावर आपली भूमिका काय? कर्नाटकात वीर सावरकरांचा इतिहासांच्या पुस्तकांतून हटवू इच्छितात, याला तुमचा पाठिंबा आहे का. तुम्ही दोन्ही पाऊल वेगवेगळी ठेवू नका आमच्या प्रश्नाची उत्तरे द्या असे अमित शहा यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी शब्द मोडला. २०१९ ला बहुमत आल्यास फडणवीस मुख्यमंत्री होतील हे मान्य केले होते याचा पुनरुच्चारही शहा यांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीच्या वेळेस मी आणि देवेंद्र फडणवीस हे मातोश्रीवर गेले होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी बहुमत आल्यास फडणवीस मुख्यमंत्री होतील हे मान्य केले होते. मात्र, निवडणूक झाली आणि ते सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आणि भाजपला धोका दिला. याबाबत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. राज्यात शिवसेना – भाजप युतीचे सरकार आले आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आले असून यात शिवसेनेला धनुष्यबान पुन्हा मिळाला आहे, यातून खरी शिवसेना कुणाची आहे हे समजते असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

४५ जागांच्या विजयाचा संकल्प

देवेंद्र फडणवीस यांनी ४५ जागांचे लक्ष ठेवले आहे. आणि हा संकल्प आपण पूर्ण करणार असे दिसून येत आहे. महाराष्ट्राला देशात एक नंबरवर आणण्यासाठी देवेंद्र फडणचीस यांनी मुख्यमंत्री असताना अनेक प्रयत्न केले. मराठवाडा हा प्रांत हैदाराबादचा हिस्सा होता. देश स्वातंत्र झाला तरी मराठवाड्याला स्वातंत्र मिळालेले नव्हते. हैदराबादच्या राज्यकर्त्यांनी जनतेवर अनेक अत्याचार केले. वल्लभभाई पटेल यांनी आक्रमक होत मराठवाडा मुक्त केला होता. भाजपचे सरकारची ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रातील जनतेने २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. यात मोदी सराकारने जनतेसाठी अनेक योजना आणल्या. जनतेसाठी हिताचे निर्णय घेतले. २००४ ते २०१४ सोनिया गांधींनी जे सरकार चालवले ते सर्वात भ्रष्ट सरकार होते. यात शरद पवार देखील मंत्रिमंडळात होते. या यूपीए सरकारने १२ लाख कोटींचे घोटाळे केले अशी टीकाही शहा यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!