MumbaiNewsUpdate : वसतिगृहातील त्या विद्यार्थिनीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त…
मुंबई : मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात ६ जून रोजी सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका मुलीचा मृतदेह विविस्त्र अवस्थेत आढळून आला. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या तरुणीवर जबरदस्ती करुन तिची हत्या केल्याचा संशय वसतिगृहाच्या सुरक्षारक्षवार घेण्यात आला. मात्र मरीन ड्राईव्हच्या या पिडीत तरुणीच्या शवविच्छेदन प्राथमिक अहवालात तरुणीवर अत्याचार झाला याविषयी एकही पुरावा मिळाला नाही. अजून पूर्ण अहवाल समोर आला नसून याविषयी अजून चाचण्या घेण्यात येणार आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या या हत्या प्रकरणात ही गोष्ट देखील समोर आली की, सुरक्षा रक्षकाने यापूर्वीही तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. तिने ही गोष्ट तिच्या मैत्रिणीलाही सांगितली होती. मुलीचा मृतदेह सापडला तेव्हा सुरक्षा रक्षकही गायब होता. त्यानंतर त्यांनेही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
दरम्यान ही विद्यार्थिनी दोन दिवसांनी तिच्या घरी जाण्यासाठी तयारी करत होती अशीही माहिती पोलिसांनी दिलीय. तर घटनेनंतर फरार झालेला सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया याचा मोबाईल इमारतीत सापडला होता. पोलिसांकडून प्राथमिक चौकशी केली जात आहे. ओमप्रकाशने बलात्कार केल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली होती. मात्र आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यामुळे याविषयी अधिक चौकशी केली जाणार आहे.
चर्चगेट परिसरात मुलींसाठी सावित्रीबाई फुले महिला वसतीगृह आहे. या वसतीगृहात चौथ्या मजल्यावर तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर हॉस्टेलचा सुरक्षा रक्षक बेपत्ता होता. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सुरक्षा रक्षकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्या केल्यानतंर सुरक्षारक्षकाने चर्नी रोड स्थानकात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ओमप्रकाश कनोजिया असे त्याचे नाव असून तो गेल्या १८ वर्षांपासून वसतीगृहात सुरक्षारक्षकाचे काम करत होता. पीडितेवर अतिप्रसंग करून त्याने तिची हत्या केली आणि स्वत: रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली असा त्याच्यावर संशय आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत.