Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdaate : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी , तुमचा दाभोळकर करू …

Spread the love

मुंबई : सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या बाबत मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली. मुंबई पोलीस आय़ुक्तांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अशी धमकी येणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी एका युजरने दिली आहे. त्याने तुमचा दाभोळकर करू असे म्हटले आहे.

शरद पवार यांना आलेल्या धमकीनंतर सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांना आलेली धमकी अत्यंत दुर्दैवी आहे. यानंतर काही घडल्यास याला महाराष्ट्राचे आणि देशाचे गृहमंत्री जबाबदार असतील असंही त्यांनी म्हटलं. वेबसाईटवरून धमकी दिली जात आहे. अशा धमक्या येत असतील तर गृहमंत्र्यांनी तातडीने नोंद घ्यावी. हा विषय मुंबईच्या पोलीस आयुक्तांसमोर मांडला आहे. पवारांना आलेली धमकी दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद असतात पण द्वेष ज्या पद्धतीने पसरला जातोय ते वाईट असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करून आम्हाला योग्य न्याय मिळावा. या सगळ्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे.

दरम्यान महाराष्ट्रात गुन्हे वाढत आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात लक्ष द्यावे महाराष्ट्रात काय चालले आहे ते पहावे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक मुलगा सोलापूरमध्ये दोन मुलींसोबत कॉफी पित होता, प्राध्यापकही त्यावेळी होते. तेव्हा कोणीतरी मुले आली आणि त्यांना मारलं. कोण कुठला हे न पाहता मारहाण केली गेली. हे गुंडाराज आहे का? सोलापूरसारख्या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या प्राध्यापकांसोबत कॉफी पिऊ शकत नसतील तर व्यवस्थेचे अपयश आहे.

अजित पवार काय म्हणाले ?

शरद पवार यांना सौरभ पिंपळकर नावाच्या अकाउंटवरून धमक्या देण्यात आल्या. तुमचा दाभोळकर करू असे म्हटले . त्याच्या अकाउंटवर भाजपचा कार्यकर्ता असल्याचे लिहिले आहे. आता तो खरंच भाजपचा कार्यकर्ता आहे की नाही माहिती नाही, पण तसा उल्लेख आहे. त्यांच्या पक्षाने तसे बोलायला सांगितले आहे का? संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर कशाला करायचा? असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला. धमकी देणाऱ्यांना अटक व्हायला हवी. कोण मास्टरमाइंड, कुणी हे करायला भाग पाडले, त्याच्या मोबाईलची तपासणी करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली.
अजित पवार म्हणाले पुढे की, पक्ष जरूर वाढवा पण तो वाढवताना कारण नसताना इतर राजकीय नेत्यांची बदनामी करायची. त्यांची जनमाणसातली प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार वाढीस लागलेत त्याचा धिक्कार करतो. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की इतरांनी चुका केल्या म्हणून आपण करायच्या नाही. पोलिसांनी संबंधितांना अटक करावी. नियमानुसार कारवाई करावी. त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!