AurangabadNewsUpdate : संकेत कुलकर्णी खून प्रकरणी संकेत जायभायेला जन्मठेप

औरंगाबाद : सिडको एन-२ येथील कामगार चौकालगत २३ मार्च २०१८ रोजी भरदिवसा संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणाला कारखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यातील आरोपी संकेत जायभायेला न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर इतर तिघांना संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले.
या घटनेतील मुख्य आरोपी संकेत जायभाये, संकेत मचे, उमर पटेल आणि विजय जोग यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला भरला होता. २३ मार्च २०१८ रोजी दुपारी कामगार चौक रस्त्यावर दुपारी संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणावर पाच ते सहा वेळा कार घालून त्याची कारखाली चिरडून हत्या करण्यात आली होती. दहशत माजविणाऱ्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी कारचालक संकेत जायभायेसह त्याच्या साथीदारांना अटक केली होती. मुकुंदवाडी पोलिसांनी तपास करून आरोपींविरोधात न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते.
शहरात २३ मार्च २०१८ रोजी भर दुपारी संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची कामगार चौकामध्ये पाच ते सहा वेळा कारखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यातील आरोपी संकेत जायभाय, संकेत मच्चे, उमर पटेल व विजय जोग यांना पोलिसांनी अटक करून तपास केला होता. घटनेनंतर शहरातील जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला होता.
न्यायालयात आरोप पत्र दाखल केल्यानंतर शासनाने विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची या खटल्यासाठी नियुक्ती केली. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून सरकारी पक्षातर्फे २२ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे, ॲड. सिद्धार्थ वाघ यांनी सहाय्य केले. तर बचाव पक्षातर्फे ॲड. राजेश काळे, ॲड. निलेश घाणेकर, ॲड. भाले, ॲड. दळवी यांनी बाजू मांडली.