Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CrimeNewsUpdate : फेसबुकवरून मैत्री , पुढे प्रेम आणि मग “तिची” हत्त्या झाली , प्रियकर गजाआड

Spread the love

यवतमाळ :फेसबूकवरून प्रेम जुळलेल्या प्रियकराने नात्यात निर्माण झालेल्या संशयावरून आपल्या प्रेयसीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रिया रेवानंद बागेसर ऊर्फ आरोही वानखेडे असे मृत तरुणीचे नाव आहे. तर विनोद रंगराव शितोळे असे संशयिताचे नाव असून, त्याला हिंगोली जिल्ह्यातल्या शिरोळी वसमत येथे पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने हलवत त्याला चोवीस तासाच्या आत अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद आणि प्रिया यांची फेसबूकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्री प्रेमात केव्हा बदलली हे समजले नाही. त्यातूनच दोघांच्या गाठी-भेटी होऊ लागल्या. प्रियाला भेटण्यास विनोद वणीला यायचा. प्रियाचे गाव वरोरा. पण ,प्रिया वणीतल्या जैन ले-आउटमधील कृष्णा अपार्टमेंटमध्ये किरायाने रहायची. दरम्यान, या फ्लॅटचा दरवाजा बाहेरून बंद होता. मात्र, आतून दुर्गंधी येत होती. हे फ्लॅटमालकाला समजले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला तेव्हा प्रियाचा मृतदेह सापडला.

पोलीस पंचनाम्यात प्रियाच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे आढळून आले. तेंव्हा पोलिसांनी हे प्रकरण खुनाचे असल्याचा तर्क लावून तपास सुरू केला. त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तेव्हा तिचे विनोदशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी विनोद शितोळेचा शोध सुरू केला. तो त्याच्या गावी शिरोळी येथे गेल्याचे समोर आले. तेव्हा पोलिसांच्या पथकाने शिरोळी गाठून विनोदला बेड्या ठोकल्या. ओलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार विनोद आणि प्रियाचे प्रेमसंबंध जुळले. प्रिया दिसायलाही सुंदर होती. त्यामुळे विनोद तिच्यावर वारंवार संशय घ्यायचा. तिचे इतर मित्र आहेत. तिचे इतर कोणाशी तरी संबंध आहेत, असा त्याला संशय होता. खुनाच्या दिवशीही त्याने तिच्यावर संशय घेतला होता. या संशयातून दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यातून विनोदने प्रियाचा खून केल्याचे समोर आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!