Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RBI on 2000 Note Banned: २००० रुपयांची नोट आता चलनातून होणार बाद… 30 सप्टेंबरपर्यंत राहणार वैध

Spread the love

भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजारातून २०००  रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा  मोठा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. २०१८ – १९ मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी  देण्यात आली आहे.

तसेच, सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध राहणार असून ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.

२००० रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया २३ मे पासून सुरू होणार असून ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. एकावेळी फक्त २० हजार रुपयांपर्यंत २००० च्या नोटा बदलता येणार आहे. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे.

नोव्हेंबर २०१६ नोटाबंदीमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली. मात्र, मागील तीन वर्षात २००० रुपयांची एकही नोट छापली नाही. २०१६-१७ या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या ३५४२९.९१ कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर २०१७-१८ मध्ये अत्यंत कमी १११५.०७ कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन २०१८-१९ मध्ये केवळ ४६६.९० कोटी नोटा छापण्यात आल्या. २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन आर्थिक वर्षांमध्ये २००० रुपयांची एकही नोट छापलेली नाही.

दरम्यान, संसदेत १ ऑगस्ट २०२२ रोजी दिलेल्या उत्तरात म्हटले होते की NCRB डेटानुसार, २०१६ ते २०२० दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या २००० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या २,२७२ वरुन २,४४,८३४ वर पोहोचली आहे.

 

KarnatakNewsUpate : काय आहे काँग्रेसचे सोशल इंजिनियरिंग ? आणि कोण आहेत मुख्यमंत्री पदाचे दावेदार ?


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!