…त्यामुळे पंतप्रधान शिक्षित असावेत, नोटबंदीवरून अरविंद केजरीवाल यांचा मोदींवर हल्लाबोल

आज २००० रुपयांच्या नोटेला कायमचा पूर्णविराम लावण्याचे जाहीर करण्यात आले असून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. २०१६ मध्ये करण्यात आलेल्या नोटबंदीच्या अनुभवामुळे या निर्णयावर विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा बालिशपणाचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि, २००० ची नोट आणून भ्रष्टाचार थांबेल, असे प्रथम सांगितले. आता ते म्हणत आहेत की २००० ची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपेल, म्हणूनच आम्ही म्हणतो, पंतप्रधान शिक्षित असावेत. निरक्षर पंतप्रधानांना कोणीही काहीही म्हणू शकतो, त्याला समजत नाही. याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.
पहले बोले 2000 का नोट लाने से भ्रष्टाचार बंद होगा। अब बोल रहे हैं 2000 का नोट बंद करने से भ्रष्टाचार ख़त्म होगा
इसीलिए हम कहते हैं, PM पढ़ा लिखा होना चाहिए। एक अनपढ़ पीएम को कोई कुछ भी बोल जाता है। उसे समझ आता नहीं है। भुगतना जनता को पड़ता है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 19, 2023
दुसरीकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत त्या बदलून घेण्यास सांगितले आहे. दरम्यानच्या काळात २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर वापरात असतील. आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “स्वच्छ नोट धोरण” च्या अनुषंगाने २००० मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००० च्या नोटा कायदेशीर निविदा राहतील. नोटबदलीचा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आणि जनतेला पुरेसा वेळ देण्यासाठी, सर्व बँकांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० च्या नोटांसाठी ठेव आणि विनिमय सुविधा उपलब्ध करून द्यावी असे म्हंटले आहे. एकावेळी फक्त २००० रुपयांच्या नोटा २० हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे.
RBI on 2000 Note Banned: २००० रुपयांची नोट आता चलनातून होणार बाद… 30 सप्टेंबरपर्यंत राहणार वैध
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow
