Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra political update : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर , आधी केंद्राचा विस्तार , मग राज्याचा …

Spread the love

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि खासदार गजाजन किर्तीकर यांनी भाजपकडून आपल्या गटाच्या आमदारांना भाजपाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बैठकीत केली आहे. दरम्यान भाजप आणि शिंदे यांच्या गटातील कोणत्या आमदारांना मंत्रीपदे द्यावीत यावर एकमत होत नसल्याने शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वार्तविण्यात येत आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात बदल करतील असे संकेत आहेत. कारण आगामी सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच महाराष्ट्रासह ज्या ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत त्याकडे मोदी यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.

कर्नाटक निकाल भाजपच्या विरोधात गेल्यामुळे याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप गंभीरपणे प्रयत्नशील आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतरच राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असे सांगितले जात आहे. परिणामी मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या आमदारांना आणखीन काही दिवस वाट बघावी लागणार, हे उघड आहे.

भाजपमध्येही इच्छुकांची गर्दी

दरम्यान राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळवण्यासाठी भाजपच्या इच्छुक आमदारांनी दिल्लीत फिल्डिंग लावली आहे. याबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल मिळताच राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार केला जाईल असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतील मंत्रीपदाची यादी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र भाजपची यादी अद्याप फायनल न झाल्यामुळे मंत्रीमंडळचा विस्तार काही दिवस पुढे ढकलला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

शिंदे गटातील खासदार , आमदारांची नाराजी …

उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले आमदार आणि खासदार यांनी आम्ही आता एनडीएचे घटक आहोत. त्यामुळे आमची देखील कामं झाली पाहिजेत. असा आग्रह धरीत घटक पक्षाला सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार शिंदे गटाचे खासदार गजाजन किर्तीकर यांनी केली आहे.

दोन दिवसापूर्वी शिंदे गटातील खासदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. यावर खासदारांनी आपले प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडले. आम्हाला अधिक निधी आणि समान वागणूक मिळाली पाहिजे, अशी मागणी गजानन किर्तीकर यांनी केली.

ज्यावेळी सत्तासंघर्ष झाला त्यावेळी आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो आहोत. याठिकाणी भाजप आणि आम्ही एकत्र मिळून आमचे सरकार आहे. त्यामुळे आता आम्ही एनडीएचा भाग आहोत. अगोदर महाविकास आघाडीमध्ये असल्याने एनडीएचा भाग नव्हतो. मग आता आमची कामे झाली पाहिजेत असे त्यांचा आग्रह आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!