Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra political update : जागावाटपावरून शिंदे – भाजप आणि महाविकास आघाडीत झडत आहेत चर्चा …

Spread the love

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक २०२४ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र यावेळी शिंदे गट आणि भाजप मध्ये तर महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावरून पक्षांमध्ये जोरदार जोरदार संघर्ष सुरु असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या बाह्य चर्चांमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच तू तू मै मै होताना दिसत आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या गुणवत्तेच्या आधारे जागावाटप करण्यावर भर देणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांना सांगितले की, काँग्रेसने आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे आणि हे उद्दिष्ट लक्षात घेऊन जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल. यात त्यांचा पक्ष म्हणजे काँग्रेस महा विकास आघाडी हा युतीचा एक घटक आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांचा समावेश असून शिवसेनेबारोबर वंचित बहुजन आघाडी आहे त्यामुळे जागा वाटपाचा हा गुंता निवडुका येईपर्यंत चालेल अशी शक्यता आहे.

जागा वाटपावर चर्चेपूर्वी सखोल अभ्यास : नाना पटोले

याबाबत पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की , ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली. महाविकास आघाडी (एमव्हीए) म्हणून एकत्र लढत असल्याने गुणवत्तेनुसार जागा वाटपावर भर दिला जाणार आहे. जागावाटपावर चर्चा करण्यापूर्वी प्रत्येक सीटचा सखोल अभ्यास केला जाईल. ते म्हणाले की , महाविकास आघाडी , भाजपचे “एकतर्फी आणि जुलमी” सरकार पाडण्यासाठी कटिबद्ध आहे.

दरम्यान , नाना पटोले पुढे म्हणाले की , २०१४ आणि २०१९ पेक्षा आजची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक जागेचा आढावा घेऊन निर्णय घेईल. ते पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्र हे काँग्रेसच्या विचारसरणीचे राज्य आहे. विदर्भातही काँग्रेसचा जनाधार वाढला आहे. गेल्या तीन वर्षात सर्व निवडणुकांमध्ये आपण मोठे विजय मिळवले आणि भाजपचा पराभव केला. या सर्व बाबी लक्षात घेऊन जागा वाटप करण्यात येणार आहे.

अजित पवार काय म्हणाले होते ?

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी म्हटले होते की, महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या लोकसभेच्या जागांवर एमव्हीए भागीदारांमधील जागावाटपाच्या चर्चेदरम्यान सर्वप्रथम चर्चा केली जाईल. शिवसेना ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची युती असलेलेली महाविकास आघाडी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुका ‘१०० टक्के’ एकत्र लढेल.

भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या…

२०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांपैकी २३ जागा जिंकल्या होत्या. यानंतर त्यांचा तत्कालीन मित्रपक्ष शिवसेनेने १८ जागा जिंकल्या. मात्र य्यावेळी अद्याप जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला नाही. आपल्या पक्षाने जिंकलेल्या जागा कायम ठेवण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. मात्र, यावर अधिक चर्चा झाली नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या चर्चेनंतरच उमेदवारी दिली जाईल हे उघड आहे. .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!