AurangabadCurrentNewsUpdate :औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची बदली, मनोज लोहिया नवे आयुक्त
औरंगाबाद : गृह विभागाकडून राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काहींना पदोन्नती देत बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून वेगेवेगळ्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. तर निखील गुप्ता यांच्या बदलीचे विशेष आदेश काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सोबतच दहशतवाद विरोधी पथकाचे अपर महासंचालक सदानंद दाते आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अपर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे.