देशातील सर्वात मोठे रॉकेट LVM3 लाँच, इस्रोची दुसरी यशस्वी कामगिरी
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने देशातील सर्वात वजनदार रॉकेट अंतराळात सोडण्याबरोबरच ३६ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करत आणखी एक इतिहास रचला आहे. भारताचे सर्वात वजनदार लाँच रॉकेट, लाँच व्हेईकल मार्क-III लो अर्थ ऑर्बिट मध्ये प्रक्षेपित करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजल्यापासून रॉकेट लाँच करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण करण्यात आले. फेब्रुवारीमध्ये SSLV-D2/EOS07 मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर २०२३ मधील इस्रोची ही दुसरी यशस्वी कामगिरी आहे. विशेष म्हणजे या रॉकेटबरोबरच ३६ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.
अधिकृत माहितीनुसार, ४३ मीटर उंच इस्रोच्या रॉकेटने ब्रिटनच्या एका कंपनीच्या ३६ उपग्रहांना एकत्र घेऊन उड्डाण केले आहे. एमवीएम ३ ने ज्या उपग्रहांसह उड्डाण केले त्यांचे एकूण वजन ५ हजार ८०५ टन आहे. या मोहिमेला (LVM3-M3/OneWeb India-2) एमवीएम ३-एम ३/ वनवेब इंडिया – २ असे नाव देण्यात आले आहे. इस्रोने ट्वीट करून या मिशनच्या प्रक्षेपणाची माहिती दिली होती. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार हे रॉकेट पृथ्वीच्या ४५० किलोमीटर सर्कुलर ऑर्बिट ३६ वनवेब जेन-१ सॅटलाइट स्थापन करेल. याचे एकूण वजन ५८०५ किलो आहे. एमवीएम ३ यापूर्वी पाच वेळी यशस्वी लाँच करण्यात आले आहे. चंद्रयान-२अभियानमध्येही याचा वापर करण्यात आला होता.
एमवीएम ३ हे इस्रोचे सर्वात वजनदार प्रक्षेपण यान आहे ज्याने चांद्रयान-२ मोहिमेसह आतापर्यंत पाच यशस्वी उड्डाणं पूर्ण केली आहेत. ब्रिटनच्या वनवेब ग्रुप कंपनीने ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोची व्यावसायिक शाखा, न्यूजस्पेस इंडिया लिमिटेडशी करार केला होता. एअरटेल म्हणजेच भारती एंटरप्रायझेस ही ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वन वेबमध्येही शेअरहोल्डर आहे. इस्रोचे वनवेबसोबत दोन करार आहेत, त्यापैकी एक गेल्या वर्षी झाला होता. या रॉकेटमधून दुसऱ्यांदा खासगी कंपनीचा उपग्रह वाहून नेण्यात आले असून याचा सक्सेस रेट १०० टक्के आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही इस्रोने एमवीएम ३ रॉकेटने वनबेसचे ३६ उपग्रह प्रक्षेपित केले होते.
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow
Mini Truck / Chotta Hathi : For More details call now : 9762041481