Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Rahul Gandhi Disqualified LIVE Updates : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

Spread the love

 Rahul Gandhi Disqualified LIVE Updates

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात मोहिमेला वेग देत आज काँग्रेसच्यावतीने देशभरातील गांधी पुतळ्यांसमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन सकाळी १० वाजता सुरू होणार असून सायंकाळी ५ वाजता संपणार आहे.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा बायो डिस’क्वालिफाईड खासदार म्हणून अपडेट केला आहे.

 

भाजप राहुल गांधींना बोलू देत नाही. राहुल गांधी देशासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी लढत आहेत आणि आम्ही थांबणार नाही. आज आम्ही गांधी स्मारकात जात आहोत आणि तिथे सत्याग्रह करणार आहोत : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

 

काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल आणि इतर नेते पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानावरून निघाले.

 

♦ Mumbai : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात आज मुंबई काँग्रेसचा केंद्र सरकार विरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात माजी खासदार मिलींद देवरा, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, मधू चव्हाण यांच्यासह अन्य नेते सहभागी होणार आहेत.

 

♦  Nagpur : नागपूरच्या व्हरायटी चौकात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन होणार आहे. याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होण्याची शक्यता आहे.

 

♦  Delhi : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांच्यासह राजघाटावर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एक दिवसाचे सत्याग्रह करणार आहे.

 

मोदी आडनावावर मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामुळे राहुल गांधी यांची खासदारकीही रद्द झाली आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून देशभरात निदर्शने काढली जात आहे.

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, “माझा आवाज दाबला जात आहे,” असे राहुल गांधी म्हणाले आणि चार मंत्र्यांनी केलेल्या खोट्या आरोपांविरुद्ध आपण सभापतींशी बोललो, पण बोलू दिले नाही, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील संबंध नवीन नाहीत असा आरोपही त्यांनी केला व शेल कंपन्यांमधून आलेले २०,००० कोटी रुपये कोणाचे आहेत याबद्दल मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही असे देखील ते पुढे म्हणाले.

नड्डा यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “राहुल गांधीचा अहंकार खूप मोठा आहे आणि समज खूपच लहान आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आणि त्यांना चोर म्हटले. समाजाने वारंवार समजावून सांगून माफी मागण्याच्या पर्यायाकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. आणि न्यायालय आणि सतत ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या.

आम्ही ही लढाई कायदेशीर आणि राजकीय दोन्ही प्रकारे लढू. आम्ही घाबरणार नाही किंवा गप्प बसणार नाही. पीएम-संबंधित अदानी महामेगा स्कॅममध्ये जेपीसीऐवजी, राहुल गांधी अपात्र आहेत. जयराम रमेश यांनी ट्विट केले.

.

.

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

आपलं सरकार

Click to listen highlighted text!