बेलेश्वर झुलेलाल मंदिरात मोठी दुर्घटना, विहिरीचे छत कोसळल्याने २५ हून अधिक लोक विहिरीत पडले
इंदूर येथे बेलेश्वर झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या दिवशीच मोठी घटना घडली आहे. मंदिरातील विहिरीवरील छत कोसळल्यामुळे २५ हून अधिक लोक विहिरीत पडले आहेत. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. याच मंदिरात आज रामनवमीनिमित्त भाविकांची गर्दी होती.
#WATCH | Madhya Pradesh: Many feared being trapped after a stepwell at a temple collapsed in Patel Nagar area in Indore.
Details awaited. pic.twitter.com/qfs69VrGa9
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 30, 2023
मंदिरात भाविकांची रेलचेल असतानाच मंदिरातील विहिरीचे छत कोसळले. छत धसल्यामुळे तिथे असलेले भाविक थेट विहिरीत पडले. जवळपास २५ श्रद्धाळू विहिरीत अडकले असल्याचे वृत्त आहे. तिथे उपस्थित असलेल्या भाविकांनी प्रसंगावधान राखत विहिरीतील लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. तसेच, नागरिकांनी रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिसांनाही फोन करुन दुर्घटनेची माहिती दिली. जखमी झालेल्या लोकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येत असून आत अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. कलेक्टर व रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आहे. दरम्यान, मंदिरात आज होमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे.
Madhya Pradesh | Many feared being trapped after a stepwell at a temple collapsed in Patel Nagar area in Indore.
Details awaited. pic.twitter.com/FeYUm7Oncf
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 30, 2023
दुर्घटना, दुर्घटना
संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, पोलिसांच्या आणि खासगी मिळून १३ गाड्या जाळल्या
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow
Mini Truck / Chotta Hathi : For More details call now : 9762041481