Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, पोलिसांच्या आणि खासगी मिळून १३ गाड्या जाळल्या

Spread the love

रामनवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमी राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटाने जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली. या घटनेने रौद्ररूप धारण केले पोलिसांच्या आणि खासगी मिळून १३ गाड्या जाळण्यात आल्या. काही पोलीस जखमी झाल्याचेही वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत १२ गोळ्या झाडल्या. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत.

गुरुवारी साजरा होणाऱ्या रामनवमीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या किऱ्हाडपुरातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. रात्री बारा वाजेच्या सुमारास काही कारणावरून दोन गटांत वादाची पहिली ठिणगी पेटली. दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची होऊन वाद वाढला आणि शिवीगाळापर्यंत पोहोचला. त्यानंतर हा वाद आणखी पुढे गेला. पुढे दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व पोलीस रस्त्यावर होते. सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात काही पोलीसदेखील जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील मंदिरात मध्यरात्री गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर हल्ला करण्यात आला. मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या आणि खासगी मिळून अशा एकूण १३ गाड्या जाळल्या गेल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

शहरातील किराडपुरा भागात रात्री झालेल्या वादानंतर पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तर स्वतः पोलीस आयुक्त निखिल गुप्ता घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील शहरातील वेगवेगळ्या भागात लक्ष ठेवून आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून, शांतता आहे. तसेच भाविक नेहमीप्रमाणे मंदिरात येऊन दर्शन घेऊन जात आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

AurangabadNewsUpdate : संभाजीनगर शहरात दोन गटात राडा , पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात , सर्व काही सुरळीत …


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

आपलं सरकार

Click to listen highlighted text!