Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Budget Session Highlights : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात एकूण १७ विधयके पारित

Spread the love

शनिवारी २५ मार्चला राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाला असून पावसाळी अधिवेशनाची घोषणा देखील झाली. १७ जुलै रोजी अधिवेशन सुरु होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशात काल अनेक विधयके संमत करण्यात आली व अधिवेशन अनेक मुद्यावरून गाजले.

यंदा विधान परिषदेत १२५ तास २० मिनिटे तर विधानपरिषदेत १६५ तास ५० मिनिटे काम काज झाले. विधान परिषदेत सरासरी कामकाज ६ तास ५७ मि.झाले. सन्माननीय सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ही ९१.२२% होती तर सदस्यांनी एकूण सरासरी उपस्थिती ८०.६०% होती. विधान सभेचे रोजचे सरासरी कामकाज ९ तास १० मिनिटे झाले. सन्माननीय सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९४.७१% होती. तर एकूण सरासरी सदस्यांची उपस्थिती ८०.८९% होती. या अधिवेशात दोन्ही सभागृहात १७ विधयके ही पारित करण्यात आली.

अर्थसंकल्पीय अधिवेशानात दोन्ही सभागृहात मंजूर झालेली विधयके

 • महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२३ (वित्त विभाग)

 

 • महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधीकरण विधेयक, २०२३. (वैद्यकीय शिक्षण विभाग)

 

 • मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2023 (नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत) (नगर विकास विभाग)

 

 • महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, 2023 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (ग्राम विकास विभाग)

 

 • महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण विधेयक, 2023 (सामान्य प्रशासन विभाग)

 

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (विद्यापीठांचे कुलगुरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता सुधारणा करणे) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

 

 • महाराष्ट्र कामगार कायदे (सुधारणा) विधेयक, 2022 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)

 

 • महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, 2023. (वित्त विभाग)

 

 • महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग)

 

 • पंढरपूर मंदिरे (सुधारणा) विधेयक, 2023 (विधि व न्याय विभाग)

 

 • महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2023 (वित्त विभाग)

 

 • महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क नियमन) (सुधारणा)

 

 • महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना (सुधारणा) विधेयक, 2023 (विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याबाबत) (नगर विकास विभाग)

 

 • महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (सुधारणा) विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

 

 • महाराष्ट्र गोसेवा आयोग विधेयक, 2023

 

 • महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) विधेयक, 2023. (विशेष पोलीस आयुक्त या पदाच्या संदर्भाचा समावेश करण्यासाठी वैधानिक तरतुद करणे) (गृह विभाग)

 

 • महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2023 (कोविड-19 वैश्विक साथरोग राहिलेला नसल्याने त्या अनुषंगाने कलम 73अअअ मध्ये केलेली सुधारणा वगळणेबाबत.) (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)

 

विधान परिषदेत प्रलंबित विधेयक

 • स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

 

 • संयुक्त समितीकडे विधेयके

 

 • महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग)

 

मागे घेण्यात आलेली विधेयके

महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गूंतवणूक सुविधा विधेयक, 2023. (उद्योग, ऊर्जा व कामगार)
महाराष्ट्र राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्यची गरज लक्षात घेता, राज्यात अधिकाधिक गुंतवणुक आकर्षित करणेसाठी तसेच राज्यमध्ये व्यवसाय सुलभीकरण करण्यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेले परवाने, संमती विहीत वेळेत मिळवण्यासाठी तसेच त्याद्वारे उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी एक खिडकी योजनेला वैद्यानिक दर्जा मिळवण्याची तरतुद करण्याकरिता विधेयक

 

 

देशातील सर्वात मोठे रॉकेट LVM3 लाँच, इस्रोची दुसरी यशस्वी कामगिरी


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

आपलं सरकार

Click to listen highlighted text!