HingoliNewsUpdate : महिला दिनाच्या दिवशी ऊसतोड महिलांना मिळालं ‘स्वतंत्र ऊसतोड कामगार’ म्हणून ओळखपत्र…
हिंगोली / प्रभू नांगरे : ‘जागतिक महिला दिन’ निमित्ताने महिला ऊसतोड कामगारांना ‘स्वतंत्र कामगार’ म्हणून ओळखपत्र वाटप करण्याच्या उद्देशाने मकाम संलग्नित महिला ऊसतोड कामगार संघटना आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, हिंगोली येथे ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लातूर समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त श्री. अविनाश देवसटवार, प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नामदेव केंद्रे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.शिवानंद मिनगीरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, उगम ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, महिला ऊसतोड कामगार संघटनेच्या जिल्हाप्रमुख छाया पडघन, तालुकाप्रमुख अर्चना सभादिंडे, शारदा तांबारे, कलावती सवंडकर, वाई गावच्या सरपंच मीरा म्हस्के, ग्रामसेवक विमल राठोड, दाभडी गावाचे श्री. सरपंच गौतम ढेंबरे इ. पाहुणे उपस्थित होते.
विचारमंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व मान्यवरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन शिवानंद मिनगीरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकाची मांडणी केली. त्यानंतर हिंगोली जिल्हयातील महिला ऊसतोड कामगारांना ‘स्वतंत्र कामगार’ म्हणून ओळखपत्र वाटप करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी श्री.शिवानंद मिनगीरे यांनी जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या परिस्थितीविषयी मांडणी केली. ते म्हणाले, आपल्या हिंगोली जिल्ह्यात एकूण ५ साखर कारखाने कार्यरत असून, सदर कारखान्यात एकूण ११,९८५ ऊसतोड कामगार काम करत आहेत. त्यापैकी ७,११७ पुरुष आणि ४,८६८ महिला ऊसतोड कामगार आहेत. त्यामुळे उर्वरित ज्या ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळालेले नाही, त्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे संबंधित ग्रामसेवकामार्फत नोंदणी करुन ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन केले.