७ लाखांच्या उत्पन्नावर कर नाही, टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणाली अंतर्गत करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही नवीन आयकर प्रणाली अंतर्गत, कर सूट मर्यादा २.५० लाख रुपयांवरून ७ लाख रुपये करण्यात आली आहे. हा कर किती असेल? तुमचा पगार, बोनस, पीएलपी आदींवर सारे अवलंबून असणार आहे.
कर स्लॅब : किती भरावा लागणार?
केंद्र सरकारने कर प्रणालीमध्ये मोठा बदल केला आहे. ३ ते ६ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५% कर आकारण्यात येणार आहे. ६ ते ९ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १०% कर आकारण्यात येणार आहे, ९ ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १५% कर आकारण्यात येणार आहे, १२ ते १५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर २०% कर आकारण्यात येणार आहे आणि १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३०% कर आकारण्यात येणार आहे.
नवीन टॅक्स स्लॅब
0 ते 3 लाख रुपये उत्पन्न – शून्य,
3 ते 6 लाख रुपये उत्पन्न – 5% कर
6 ते 9 लाख रुपये उत्पन्न – 10% कर
9 ते 12 लाख रुपये उत्पन्न – 15% कर
12 ते 15 लाख रुपये उत्पन्न – 20% कर
15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न– 30% कर
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055