शेळ्या चरण्यासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

औरंगाबाद : शेळ्या चरण्यासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. राहुल पंडित मगरे (वय २१ वर्षे, रा. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंडापैकी २० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडितेला देण्याचे आदेशात म्हटले आहे.
अल्पवयीन पीडितेच्या आईने हर्सूल पोलिसात दिलेल्या फिर्यादिवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेच्या आईने हर्सूल पोलिसात दिलेल्या फिर्यादिनुसार, पीडीत मुलगी सकाळी ११ वाजता बकऱ्या चरण्यासाठी घेऊन जायची आणि सायंकाळी पाच वाजता घरी येत होती. दरम्यान परिसरात राहणारा राहुल पंडित मगरे हा देखील पीडितेसोबत बकऱ्या चरायला नेत होता. त्यामुळे दोघांची ओळख झाली होती. दरम्यान एक दिवस पीडिता ही नेहमीप्रमाणे बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेली असता, आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने बकऱ्या दुसरीकडे चरण्यासाठी नेल्या मात्र घटनेच्या सुमारे १५ दिवसांनंतर पीडिता बकऱ्या चरण्यासाठी कोलठाणवाडी परिसरात घेऊन गेली असता, आरोपी तिला तेथे येऊन भेटला. तसेच त्याने पुन्हा पीडितेवर बलात्कार करून धमकी दिली.
आरोपीने अत्याचार केल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने याबाबत कोणालाही काहीही सांगितले नाही. दरम्यान ३ नोव्हेंबर २०१९ रोजी दिवाळीनिमित्त मुलीची आई आपल्या कुटुंबासह बहिणीकडे गेल्या होत्या. त्यावेळी पीडीत मुलीच्या बहिणीला पीडितेचे ओटीपोट वाढलेले दिसले. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना दाखवले असता, पीडिता सात ते आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र; पत्रकार परिषदेत केली युतीची घोषणा
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055