नागपूर हिवाळी अधिवेशनातील आजचा गोंधळ…
हिवाळी अधिवेशनात काल सभागृहात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विधानावरून झालेल्या गोंधळानंतर काल त्यांना हिवाळी अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांनतर आज देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर ठिय्या आंदोलन केले.
आमदार जयंत पाटील यांच्यावर कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच कारवाई करण्यात अली होती. त्या संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न जाता पायर्यांवर ठिय्या आंदोलन केले आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना म्हणाले, जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेत त्यांना सभागृहात बसू द्यावे, अशी आमची मागणी आहे. मात्र, ती मान्य होत नसल्याने आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. जयंत पाटील यांना अडकविण्यासाठी राजकारण करून चित्र रंगवण्यात आले आहे.
तर, कर्नाटक सरकार महाराष्ट्राला एकही इंच जागा न देण्याचा ठराव करत आहे. आता तरी आपल्या सरकारने सीमावादावर ठराव आणावा. आमचा त्याला विरोध राहणार नाही.’ असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. सत्तापक्ष गैरसमज पसरवित आहे. काल एयू वरून त्यांनी गदारोळ केला. वास्तविक पाहता रिया चक्रवर्तीने स्वतः एयू म्हणजे अनन्या उदास हे स्पष्ट केले आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी बसवून सरकार ३२ वर्षीय तरुणाला किती घाबरले आहे, हे दिसून आल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू
शौचालयाच्या पाण्याने कपबशी धुतल्यानंतर आणखी एक प्रकरण उघडकीस…
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY