वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू
उत्तर सिक्कीममधील झेमा येथे लष्करी वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. शुक्रवारी एक वाहन दरीत कोसळे, या अपघातात १६ जवानांचा जागीच मृत्यू असून चार जण जखमी झाले आहेत. वळण घेत असताना वाहन उतारावरून घसरल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. गंभीर असलेल्या जवानांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळी लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन जात होत्या. हा ताफा चाटणहून थांगूच्या दिशेने निघाला होता. गेमा येथे जात असताना वळणावर तीव्र उतार असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन खाली दरीत कोसळले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. ४ जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ सैनिकांसह एकूण १६ जवानांना मृत्यू झालाय. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ट्विट करुन म्हटले आहे
शौचालयाच्या पाण्याने कपबशी धुतल्यानंतर आणखी एक प्रकरण उघडकीस…
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY