शौचालयाच्या पाण्याने कपबशी धुतल्यानंतर आणखी एक प्रकरण उघडकीस…
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला पाच दिवस पूर्ण झाले असून सत्तदारी आणि विरोधी पक्षामध्ये खडाजंगी सुरु आहे. दरम्यान, आमदार निवासातील कपबशी धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. दरम्यान, या प्रकारानंतर आमदार निवासातील शौचालयाच्या दाराजवळच फळे धुतल्याच्या प्रकार समोर आहे. त्यामुळे कंत्राटदारांवर सरकारचा वचक आहे की नाही, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, काल अमोल मिटकरी यांनी या मुद्द्यावरून ट्वीटच्या माध्यमातून सरकारवर टीका केली होती. ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा हॅशटॅग वापरून अमोल मिटकरींनी यासंदर्भातील व्हिडीओ ट्वीट केला होता. “हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था,” असे अमोल मिटकरी या ट्विट मध्ये म्हणाले होते.
आमदार निवासातील कपबशी शौचालयाच्या पाण्याने धुतल्याच्या घटनेची दखल स्वत: विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतली होती. मुख्यमंत्र्यांनीही सांगितले की या प्रकरणात कंत्राटदार, अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. मात्र, त्यानंतरही असा प्रकार घडत असेल, तर चुकीचे आहे. याबाबत सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. अशा घटना सातत्याने घडत असेल तर सकाकारचा कंत्राटदारांवर वचक दिसत नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राट दाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था.#आझादीकाअमृतमहोत्सव. pic.twitter.com/pi5rJnJxfm
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 21, 2022
#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055