गडचिरोली : ६० ते ६५ विध्यार्थी घरी जात असतांना स्कूल बसचा अपघात
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथून आसरअलीकडे निघालेल्या स्कूल बसचा अपघात झाला. ही बस अंकिसा येथून जवळपास ६० ते ६५ विद्यार्थ्यांना आसरअलीकडे घेऊन जात होती. या बसमधील अनेक विध्यार्थी गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. या अपघातात नेमके किती विद्यार्थी जखमी झाले याची अधिकृत माहिती मिळाली नसून पालकांनी आपापल्या पाल्यांना उपचारार्थ दाखल केले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ए पी – १५ एक्स ९६१७ क्रमांकाची स्कूल बस अंकिसा येथील लक्ष्मीकांतय्या इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल येथून शाळा सुटल्यावर जवळपास ६० ते ६५ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन आसरलीकडे जात होती. दरम्यान, ही बस रस्त्याच्या कडेला उलटल्याने यातील अनेक विध्यार्थी गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. स्कूल बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच आसरअली येथील पालकांनी धाव घेत आपापल्या पाल्यांना जवळपास असलेल्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. सदर अंकिसा ते आसरअली हा राष्ट्रीय महामार्ग असून हा रस्ता थेट छत्तीसगडकडे जातो. स्कूल बस म्हणून वापरत असलेले वाहन हे आंध्र प्रदेशची पासिंग असून ही बस अक्षरशः भंगार स्थितीत होते. तसेच या बसचा वाहनचालक नशा करून वाहन चालवत असल्याची माहिती काही पालकांनी दिली आहे.
बुलढाणा : बाळाला दुचाकीवर दूध पाजताना महिलेचा मृत्यू
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055