उभ्या ट्रक वर कार आदळून भीषण अपघात , एकाच कुटुंबातील ६ ठार , मूल मात्र वाचले !!
बिकानेर : भरधाव कारने ट्रकला भीषण धडक दिली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की क्रेननं मृतदेह काढावे लागले आहे. या अपघातात एक छोटं मूल वगळता सर्वांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील बिकानेर येथे गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.
ही घटना बिकानेरपासून 100 किमी अंतरावर असलेल्या महाजन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. कारमधून रात्री प्रवास करत असताना वेळ जास्त होता. शिवाय रात्र असल्याने समोरचा ट्रक दिसला नाही आणि कार त्यावर धडकली. मृत्युमुखी असलेले सर्वजण हरियाणातील डबवली भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. जैतपूरहून हनुमानगडच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या कारने मागून ट्रकला धडक दिली. त्यामुळे कारमध्ये बसलेल्या सर्वांचा मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की कारचे अक्षरशः तुकडे झाले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की कारचा वेग खूप होता आणि रात्रीची वेळ असल्याने चालकाला ट्रक पुढे जाताना दिसत नव्हता. त्यामुळेच हा अपघात झाला. माहिती मिळताच लुंकरनसरचे सीओ नरेंद्र पुनिया यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, टोल प्लाझाची रुग्णवाहिकाही तेथे पोहोचली. हा अपघात एवढा भीषण होता की कार पूर्णपणे कोसळली आणि आतील लोकांना बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवावी लागली.