Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हृदयद्रावक : अंत्यायात्रा उरकून घारी परतणाऱ्या नागरिकांना चिरडले , तिघांचा मृत्यू …

Advertisements
Advertisements
Spread the love

नारायणगाव : अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या नागरिकांच्या गर्दीत नगरकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक शिरल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन ठार तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावरील गुळंचवाडी (ता.जुन्नर) येथे शुक्रवारी ( दि. १९ ) रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

दरम्यान, अपघातातील जखमींची अधिकृत माहिती मिळाली नसून जखमीची संख्या वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी ट्रकने महामार्गावर उभ्या असलेल्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली असून त्यांचे मोठे नुकसान केले आहे. जखमींना आळेफाटा व इतर भागातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संतप्त स्थानिक नागरिकांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!