महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’बाबत कायदा? उपमुख्यमंत्र्यांचं मोठं विधान…

महाराष्ट्रात ‘ लव्ह जिहाद ’ बाबत कायदा करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. आज विधानसभेत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार अतुल भातखळकर यांनी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहादबाबत कायदा करण्याची राज्य सरकारची मानसिकता असल्याचे सांगितले आहे.
अतुल भातखळकर यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख केला. “श्रद्धा वालकर प्रकरणासारख्या अनेक घटना महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत समोर आल्या आहेत. त्यामुळे लव्ह जिहादला विरोध करणारा एखादा कायदा करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे का?” असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. तसेच, “श्रद्धा वालकरने २०२० मध्ये तक्रार अर्ज केल्यानंतरही पोलिसांनी त्यावर कार्यवाही न करण्यामागे तत्कालीन सरकारच्या शीर्षस्थ नेत्यांचा राजकीय दबाव होता का?” असाही सवाल भातखळकरांनी उपस्थित केला.
दरम्यान, यासंदर्भात उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात राजकीय दबाव नसल्याचे स्पष्ट केले. “आत्तापर्यंतच्या तपासात या प्रकरणात कोणत्या राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव आढळून आलेला नाही. मात्र, तिने तक्रार परत का घेतली? याची चौकशी आपण करत आहोत. त्याचसोबत तिने तक्रार करणे आणि ती परत घेणे यात एका महिन्याचा कालावधी गेला. २३ तारखेला तिने तक्रार केली आणि पुढच्या महिन्याच्या १९ तारखेला तक्रार परत घेतली. यादरम्यान पोलिसांनी काय कारवाई केली? तेव्हा जर तपास केला असता, तर हा प्रकार टाळता आला असता. त्याचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आपण याची माहिती घेत आहोत की इतके दिवस त्यांनी कारवाई का केली नाही?” असे फडणवीस म्हणाले.
“यावर पुढचा उपाय म्हणून आपण सांगितले की अशा परिस्थितीत एखाद्या महिलेची तक्रार आल्यावर पोलिसांनी त्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. किमान तिला बोलवून तिचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ४० मोठे मोर्चे निघाले. यात लव्ह जिहादबाबत कठोर कायदा करण्यात यावा. इंटरफेथ मॅरेजला सरकारचा कोणताही विरोध नाही. मात्र, गेल्या काही काळात जाणीवपूर्वक षडयंत्राचा भाग म्हणून काही जिल्ह्यांमध्ये असे विवाह केले जात आहेत. वर्ष-दीड वर्षात त्या मुलीला त्रास दिला जातो. अशा घटना मोठ्या प्रमाणावर बाहेर येताना दिसत आहेत”, असे देवेंद्र फडणवीसांनी यावेळी नमूद केले आहे.
“काही राज्यांनी लव्ह जिहादच्या बाबत कायदे केले आहेत. मी जाणीवपूर्वक सभागृहाला सांगतो, की लव्ह जिहाद हा विषय सर्वात आधी केरळमध्ये बाहेर आला. हे नाव केरळच्या सरकारने त्याला दिले आहे. हे कुठल्या धर्माच्या विरोधात कार्यवाही आहे असे नाही. पण अशा घटना घडत आहेत. म्हणून वेगवेगळ्या राज्यांनी याबाबत जी भूमिका किंवा कायदे केले आहेत, त्यांचा अभ्यास करून आपल्याकडे यासंदर्भात प्रभावी कायदा करण्याची गरज असेल, तर तो करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे. षडयंत्राचा भाग म्हणून कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. आवश्यकता असेल, तर राज्य सरकार नक्कीच तसा प्रयत्न करेल”, असे देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम होत असेल तर ते खपवून घेऊ नका – जयंत पाटील
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055