Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliceNewsUpdate : मोठी बातमी : पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांसह ३० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या …

Spread the love

मुंबई : आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर शिंदे-फडणवीस सरकारने ३० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. यामध्ये  पुण्याचे पोलीस पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचाही समावेश आहे. शिंदे फडणवीस सरकारने प्रथमच आयुक्त आणि पोलीस महासंचालकपदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.


या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सर्वाधिक चर्चा  पुण्याचे पोलीस आयुक्त अमितभ गुप्ता आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर या दोन्हीही आयुक्तांवर हे प्रकरण शेकल्याची चर्चा आहे. यामध्ये अमिताभ गुप्ता यांची  राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी रितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली गेली असून मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था ) असलेले विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. विनय कुमार चौबे यांची या पदावरून बदली झाल्याने या रिक्तपदावर नांगरे पाटील याना बसवण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!