क्षितीज स्नेहसंमेलन आझादी का अमृत महोत्सव जल्लोषात संपन्न …

एम.जी.एम. संस्कार विद्यालय सिडको औरंगाबाद आयोजित ‘ क्षितीज स्नेहसंमेलन आझादी का अमृत महोत्सव ’ रुक्मिणी सभागृह येथे घेण्यात आले. या स्नेहसंमेलन प्रसंगी एम.जी.एम. संस्थेचे सचिव श्री अंकुशराव कदम, एम.जी.एम. ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका डॉ. अपर्णाजी कक्कड, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री. गणेश घुले, विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती उषा जाधव, मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. विशाल भुसारे,प्रशासक श्रीमती मल्लिका नायर आणि श्रीमती सुषमा मोहिते स्नेहसंमेलन विभाग प्रमुख श्रीमती मिनल पाटील, सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नृत्य दिग्दर्शक टीम, सन्माननीय पालक इत्यादींची उपस्थिती कार्यक्रमास लाभली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादर केले. सूत्रसंचलनासाठी विद्यार्थ्यांना श्री. संतोष धुमाळ व श्रीमती रोहिणी कदम या शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली .प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय सायली अमोदकर या विद्यार्थिनीने सादर केला,कार्यक्रमाची प्रस्तावना स्नेहसंमेलन प्रमुख श्रीमती मीनल पाटील यांनी तर, अहवालवाचंन प्राचार्या श्रीमती उषा जाधव यांनी केले .प्रमुख पाहुणे श्री.गणेश घुले यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मौलीक मार्गदर्शन केले. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी मराठी शाळेत शिकत आहेत म्हणून पालकांचे अभिनंदन व विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.
पालकांनी आपल्या मुलांना आपला अमूल्य वेळ द्यावा, जेणेकरून बालगुन्हेगारीच्या समस्या दूर होतील व आपले विद्यार्थी सुजाण नागरिक बनू शकतील. प्रमुख पाहुण्यांनी आई-वडिलांकडून पाल्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपल्या कवितेद्वारे सुंदर रित्या प्रस्तुत केले.
दरम्यान, बँकॉक थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत एम.जी.एम. संस्कार विद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.– भार्गवी लोंढे व कार्तिकी आंबीलवादे यांच्या भरत नाट्यम नृत्याने स्नेहसंमेलनाच्या प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात झाली. बालवर्ग ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. देशभक्तीपर आधारित फिर भी दिल हे हिंदुस्तानी, केसरी, मा तुझे सलाम, चक दे इंडिया, वंदे मातरम, मंगल पांडे, झाशी की राणी या विविध गाण्यांवर नृत्याविष्कार करण्यात आले, हिमांशु दाभाडकर या विद्यार्थ्याने गिटार वादन केले. तसेच इयत्या ७ वी च्या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी ‘भारुड’ सादर केले. यासाठी विद्यार्थ्यांना श्री. संतोष धुमाळ यांनी मार्गदर्शन केले. हेरीटेज क्लब च्या विद्यार्थ्यांनी ‘ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन’ या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले. यासाठी विद्यार्थ्यांना हेरिटेज क्लब प्रमुख डॉ. शहनाज बासमेह यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जान्हवी तुपे या विद्यार्थिनीने केले. ‘वंदे मातरम्’ चे सामूहिक गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले .
By: Sharad Pawar
News Update on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055