डबल इंजिन सरकारचे महाराष्ट्रात वेगाने काम सुरु आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्ग, इतर विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केले. तसेच त्यांनी
“आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकाम करताना आपण प्रथम गणेशपूजन करतो. आज नागपुरात असल्याने टेकडीच्या गणपती बाप्पाला माझे वंदन,” अशी मराठीत मोदींनी सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केले. “स्वातंत्र्याला ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवात ७५ हजार कोटींच्या या विकासकामांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन. आजच्या या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करत असल्याचे दर्शवत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण २४ जिल्ह्यांना जोडत आहे. यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील,” असे नरेंद्र मोदींनी सांगितले. काही पक्ष स्वत:च्या फायद्यासाठी देशाचे नुकसान करत आहेत. आता अशा नेत्यांना उघडं पाडण्याचे काम जनतेनंच सुरु करावे”, अशी टीका देखील त्यांनी विरोधकांवर केली.
“भारतात पहिल्यांदाच असे घडतंय की जे सरकार अस्तित्वात आहे, त्या सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्पांना मानवी भावनांची जोड दिली आहे. सरकारचे लक्ष सर्वांगीण विकास आणि दृष्टिकोनासह पायाभूत सुविधांचा विकास असे आहे. राज्यांच्या प्रगतीमुळे या ‘अमृत काळा’मध्ये राष्ट्राच्या विकासाला बळ मिळेल. सातत्याने होणार वाढ आणि विकासासाठी दीर्घकालीन दृष्टी महत्त्वाची आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की औद्योगिक क्रांतीच्या चौथ्या टप्प्याचा भारत नक्कीच योग्य पद्धतीने वापर करेल. भारतीय ती संधी गमावणार नाही, कारण अशा संधी पुन्हा येणार नाहीत,” समृद्धी महामार्गाची विशेष बाब म्हणजे, याच्या दुतर्फा वनराई आणि हिरवेगार जंगल आहे. तसेच, अनेक ठिकाणी ओव्हरब्रिज किंवा अंडरब्रिज करून वन्यजीवांची व पर्यावरणाचीही काळजी घेण्यात आली आहे. त्याउद्देशाने मानवी भावनांची जोड दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
‘आमदनी अठ्ठनी अन् खर्चा रुपया’ करणारे राजकीय पक्ष देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहेत. देशाता अशा वाईट नितीपासून वाचवले पाहिजे. काही पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेला नेस्तनाबूत करण्याचं काम करत आहेत. शॉर्टकट पक्षांनाही माझे आवाहन आहे की स्थायी विकासाचे महत्व समजून घ्या. देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी भविष्याचा विचार होणे गरजेचे आहे. पुढच्या २५ वर्षांच्या विकासाच्या व्हिजनने सरकार काम करत आहे. पण काही पक्ष स्वत:च्या फायद्यासाठी देशाचे नुकसान करत आहेत. आता अशा नेत्यांना उघडं पाडण्याचे काम जनतेनंच सुरु करावे”, अशी टीका देखील त्यांनी विरोधकांवर केली.
दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “मला जाणूनबुजून पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर काही लोकांचा उल्लेख करायचा आहे. समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी आमचे राधेश्याम मोपलवार, मनोज सौनिक, प्रविण परदेशी, गायकवाड यांचं मोलाचा वाटा होता. ज्यांच्या नावाचा उल्लेख मी करू शकलो नाही त्याची मी माफी मागतो. मात्र, या टीमने जे काम केलं ते खूप जबरदस्त आहे. त्यांच्या कामामुळेच हा महामार्ग होऊ शकला.”
“हे मोदी सरकार आहे, ही मोदी सरकारची गती आहे आणि हे डबल इंजिन सरकार आहे. डबल इंजिन सरकार झाले नसते तर पुढील काही वर्षे या त्रुटी तशाच राहिल्या असत्या आणि हे कार्यक्रमही झाले नसते,” असंही फडणवीसांनी नमूद केले.
Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशचे १५ वे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू
News Update on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055