Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GujratElectionNews : गुजरात जिंकण्यासाठी तिन्हीही पक्षाची रणनीती तयार …

Spread the love

नवी दिल्ली :  गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपसह काँग्रेस आणि आप यांनी या निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यातील १८२ मतदार संघांसाठी एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल. तसेच, अंतिम निकाल ८ डिसेंबर रोजी होणार आहे.


पंजाबच्या यशाने आत्मविश्वास बळावलेल्या आम आदमी पक्षानेही  गुजरातच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. आम आदमी पक्षही गुजरातच्या मैदानात उतरल्यामुळे यंदा तिहेरी लढत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, भाजपकडून सत्ता राखण्यासाठी तर काँग्रेसकडून सत्ता मिळवण्यासाठी जोराचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान गुजरातच्या निवडणुकांची घोषणा होताच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली आहे. खर्गे यांनी गुजरातमधील जनतेसाठीचा जाहीरनामाच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, जर गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार आलं, तर नागरिकांना ५०० रुपयांत एलपीजी सिलेंडर देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, ३०० युनीटपर्यंतचे वीजबील मोफत आणि १० लाख रुपयांपर्यंत उपचार आणि औषधेही देण्यात येणार आहेत.

भाजपाची तयारी …

गुजरात निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. यासाठी आता भाजप कोअर कमिटी आणि राज्य निवडणूक समितीच्या नेत्यांची राज्यातील पक्षाच्या मुख्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित आहेत. आजच्या बैठकीत प्रामुख्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या नावांवर चर्चा आणि छाननी करण्यात येत आहे. गुजरातमध्ये यावेळी भाजप विद्यमान आमदारांपैकी सुमारे २५ टक्के आमदारांची तिकिटे कापली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!