Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#GujratUpdate | गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार असून १ आणि ५ डिसेंबरला गुजरातचे मतदान पार पडणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे.

गुजरातमध्ये १८२ जागांवर मतदान होणार असून गुजरातच्या १५ व्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहेत. त्याचदिवशी हिमाचल प्रदेश विधानसभा निकालाचेही निकाल येणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत ४.९ कोटी मतदार असून ४.६ लाख युवा मतदार आहेत. दिव्यांगासाठी १८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. ९. ८९ लाख वृद्ध नागरिक मतदान करणार आहेत. गुजरातमध्ये २०१७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण  ४.३३ कोटी मतदारांची नोंद होती.

गुजरात विधानसभा निवडणुकीत २०१७ मध्ये भाजपने  ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर, काँग्रेसला ७७ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर, दोन जागांवर बीटीपी (भारतीय ट्रायबल पार्टी) आणि एका जागेवर एनसीपीच्या उमेदवारांचा विजय झाला होता. तर, तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. दरम्यान, २०१७ला झालेल्या निवडणुकीत भाजपला १६ जागांवर फटका बसला होता. तर, काँग्रेसच्या १६ जागा वाढल्या होत्या. मात्र, तरीही भाजपच निवडणुकीत वरचढ ठरला होता.


#Uncut Press Conference Watch Full Video:

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!