Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : दिल्लीतील दलाल आमच्या आमदारांना १०० कोटी देऊन खरेदीच्या प्रयत्नात होते , केसीआर यांचा भाजपवर हल्ला बोल …

Spread the love

हैद्राबाद  : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आपल्या आमदारांना विकत घेण्याच्या प्रयत्नाबाबत यापूर्वी मोठे वक्तव्य केले आहे. दरम्यान आज रविवारीही त्यांनी आपल्या पक्षाच्या चार आमदारांना दिल्लीतील दलालांनी विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावाकरून भाजपवर हल्ला बोल केला. या निमित्ताने बोलताना केसीआर म्हणाले की, आज मी माझ्या आमदारांसोबत एकाच व्यासपीठावर आहे. यावरून हे स्पष्ट होते की आपल्याला कोणीही तोडू शकत नाही. दिल्लीतील काही दलालांनी तेलंगणाच्या स्वाभिमानाला आव्हान दिले होते. त्यांनी आमच्या चार आमदारांना १०० कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिली होती.


केसीआर  पुढे म्हणाले की, माझ्या आमदारांनी या प्रयत्नाविरोधात आवाज उठवल्यामुळे मी आज हे बोलत आहे. मी तुम्हाला हे स्पष्ट करू इच्छितो की त्यांना फक्त तेलंगण बळकावायचे आहे. मी शेतकर्‍यांना सांगतोय की, मतदान करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. लाच देऊन कोणीही आपली फसवणूक करू शकत नाही, हे तुम्हाला सांगावे लागेल.

दिल्लीच्या दलालांना आमच्या पक्षाच्या चार आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा राजकारणाला बळ देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भाजपाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला आहे.

तिघांना अटक

तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीच्या आमदारांनी पक्षांतर करावे यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले . फार्महाऊसवर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. आमदारांनीच पोलिसांना फोन करुन ही माहिती दिली होती. पोलिसांनी तिघांना अटक केली असून यामधील एकजण व्यवसायिक आहे. रामचंद्र भारती उर्फ सतीश शर्मा, नंदा कुमार आणि सिम्हयाजी अशी या तिघांची नावं आहेत. तिघांना १४ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले  आहे.

“दिल्लीतील काही दलाल तेलंगणच्या स्वाभिमानाला आव्हान देण्यासाठी आले होते. त्यांनी आमदारांना १०० कोटींची ऑफर दिली,” असं चंद्रशेखर राव यांनी सांगितले . यावेळी मंचावर त्यांच्यासोबत ते चारही आमदार उपस्थित होते. तेलंगण राष्ट्र समितीचे आमदार रोहित शेट्टी यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार रामचंद्र भारती आणि नंदा कुमार हे दोघेही भाजपाशी संबंधित असून पक्षात प्रवेश करण्यासाठी १०० कोटींची ऑफर दिली होती.

भाजपने आरोप फेटाळले …

दरम्यान काही दिवसांपूर्वीसुद्धा केसीआरकडून असा आरोप करण्यात आला होता परंतु भाजपने या आरोपाचे खानदान केले होते तसेच या आरोपांदरम्यान भाजपनेही  केसीआर यांच्यावर हल्लाबोल केला होता. तेलंगणातील ‘ऑपरेशन लोटस’चे आरोप भाजपने पोटनिवडणुकीशी जोडले होते. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय राजकारणात आपला पक्ष सुरू केल्याचे भाजपने म्हटले होते. यानंतर त्यांना पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक झाले. त्यामुळे टीआरएस भाजपवर असे आरोप करत आहे. मुनुगोडे येथे ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.

या प्रकरणी टीआरएस आमदार पायलट रोहित रेड्डी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिस एफआयआरमध्ये दिल्लीचे रहिवासी रामचंद्र भारती उर्फ ​​सतीश शर्मा आणि हैदराबादचे रहिवासी नंद कुमार हे दोघेही भाजपशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. या दोघांवर आरोप आहे की त्यांनी टीआरएस आमदारांची भेट घेतली आणि पक्षाचा राजीनामा दिला आणि पुढील निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढण्याची ऑफर दिली. त्यासाठी त्यांना १०० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!