Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

T20 world cup 2022 | भारताने नेदरलँडवर ५६ धावांनी विजय

Spread the love

ICC T20 World Cup 2022 | टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला चार गडी राखून हरवल्यानंतर आज दुसरा विजय मिळवला आहे. भारताने नेदरलँडवर ५६ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने या विजयामुळे २ सामने खेळून दुसऱ्या गटातील पॉईंट्स टेबलमध्ये पर्थम क्रमांकावर झेप घेतली आहे. या सामन्यामध्ये मागील सामन्याप्रमाणेच विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली. तर सूर्यकुमार यादवनेही २५ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या.

टी-२० विश्वचषकाच्या भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२३ धावा करू शकला. सरतेशेवटी भारताने नेदरलँडचा ५६ धावांनी पराभव केला. भारताकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर मोहम्मद शमीने एक बळी टिपला.

सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्कार

विराट कोहलीने दुसऱ्या सामन्यात ६२ धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने ५१ धावा केल्या आहे. या सामन्यात विराटने जास्त धावा केल्या, पण तरीही सूर्यकुमार यादवला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला आल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

विराट कोहलीने या सामन्यात नाबाद ६२ धावा केल्या पण त्यासाठी त्याला ४४ चेंडू खेळावे लागले, त्यामुळे त्याचा स्ट्राइक रेट हा १४०.९० एवढा होता. कोहलीची ही खेळी महत्वाची होतीच, पण भारताची धावगती वाढवण्याचे काम सूर्यकुमार यादवने जास्त चांगले केले. कारण सूर्याने यावेळी फक्त फक्त २५ चेंडूंत ५१ धावांची खेळी साकारली. त्यामुळे सूर्याचा स्ट्राइक रेट हा २०४.०० एवढा झाला होता. त्यामुळे सूर्याने कोहलीपेक्षा जास्त आक्रमकपणे फटकेबाजी करत वेगाने धावा केल्या.

भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला फोटो शेअर करणं महागात पडलं…

या विजयानंतर अनेक क्रिकेटपटूंनी ट्वीटरवरुन फोटो शेअर केले. दिनेश कार्तिकने दोन सोपे झेल सोडले आणि दोनदा यष्टीचित करण्याची संधीही सोडल्याचे दिसून आले. कार्तिकने सामना संपल्यानंतर संघाबरोबर विकेट सेलिब्रेट करतानाचा एक आणि कोहली, सूर्यकुमार चालताना एक असे दोन फोटो शेअर करत दुसरा विजय अशा कॅप्शनसहीत फोटो पोस्ट केले आहेत. मात्र दिनेश कार्तिकला हे फोटो शेअर करणं थोडं महागात पडल्याचे फोटोंखालील केमंट्सवरुन दिसून येत आहेत.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!