CongressNewsUpdate : काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची टीम तयार , शशी थरूर यांना डच्चू …
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी बुधवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या जागी काँग्रेस सुकाणू समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये गांधी कुटुंबातील सदस्यांसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह एकूण ४७ ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती काँग्रेस कार्यकारिणीच्या जागी काम करेल. खर्गे यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे शशी थरूर यांचे मात्र या समितीत नाव नाही.
CongressNewsUpdate : आज सकाळी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एआयसीसी संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, एआयसीसी सरचिटणीस आणि प्रभारी यांनी अध्यक्षांना आपले राजीनामे दिले आहेत.
मल्लिकार्जुन खरगे यांनी जवळपास २३ वर्षे काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सोनिया गांधी यांनी आज सांगितले की, त्यांना आज “निश्चिंत” वाटत आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की , “मी माझे कर्तव्य माझ्या क्षमतेनुसार पार पाडले. आज मी या जबाबदारीतून मुक्त होणार आहे. माझ्या खांद्यावरून एक भार उतरला आहे. मला आराम वाटत आहे.” “ही मोठी जबाबदारी होती, आता जबाबदारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर आहे.”
सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, आज देशातील लोकशाही मूल्यांचे संकट हे सर्वात मोठे आव्हान आहे. मला खात्री आहे की खर्गे संपूर्ण पक्षाला प्रेरणा देतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मजबूत होत राहील. काँग्रेस नेत्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की , काँग्रेससमोर अनेक आव्हाने आहेत. त्याचा सामना आपण कसा करतो हे आव्हान आहे. पूर्ण ताकदीने, एकजुटीने पुढे जायचे आहे आणि यशस्वी व्हायचे आहे.
#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment
#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide