Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : दुसऱ्या धर्माच्या तरुणीशी प्रेम केले , जात पंचायतीकडून थुंकी चाटण्याची शिक्षा , पोलिसांचे मात्र कानावर हात !!

Spread the love

समस्तीपूर : देशात कायद्याचे राज्य आहे कि नाही अशा अनेक घटना घडताना दिसतात. एकीकडे न्यायालये नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा पाठ पढवतात , पोलिसांना खरे खोटे सुनावतात पण लोकांसोबत पोलीस , प्रशासनही सुधारायला तयार नाहीत असेच दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी जात पंचायतीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत अशा जात पंचायतींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्यातच बिहारच्या समस्तीपूरमध्ये जात पंचायतीने एका मुलाने  दुसऱ्या धर्माच्या मुलीवर प्रेम केले म्हणून  पंचायतीच्या लोकांनी  प्रियकराला मारहाण करून माफी मागायला भाग पाडले आणि इतकेच नाही तर त्याला थुंकी चाटण्याची शिक्षा सुनावण्यात आली.


या प्रकरणाची अधिक माहिती अशी की , विभूतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दोन वर्षांपूर्वी वेगवेगळ्या धर्माचे जोडपे मोबाईलच्या माध्यमातून प्रेमात पडले होते. दोघांमध्ये आकर्षण वाढले आणि त्यांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. दरम्यान, प्रेमी युगुलाने आपले घर बसविण्यासाठी घरातून  पळून जाण्याचा बेत आखला. ठरलेल्या वेळी या प्रियकर -प्रेयसीने परस्परांना फोन करून घर सोडले आणि गावातून निघून गेले. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी प्रेयसीसोबत पळून जाणाऱ्या प्रियकराला गावाच्या हद्दीतून पकडून आणले आणि पंचायतीसमोर उभे केले.

यानंतर लोकांनी या  प्रियकराला बेदम मारहाण केली. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. त्यामुळे गावात दोन गटात तणाव निर्माण झाला. गावात तणाव पसरल्यानंतर काही जाणकारांनी दोन्ही बाजूंची पंचायत बोलावून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. नंतर पंचायतीने प्रियकराला माफीनामा लिहायला लावला. यासोबतच पळून जाणाऱ्या मुलाला थुंकी चाटण्याची शिक्षाही सुनावण्यात आल्यानंतर जबरदस्तीने जमिनीवर थुंकून चाटण्यास सांगितले. मुलाने ही शिक्षा मान्य केल्यावर प्रकरण मिटले. त्यानंतरच  प्रियकराला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

याप्रकरणी विभूतीपूर पोलिस स्टेशनचे एसके पाल यांनी मात्र अशी कोणतीही घटना घडल्याचे निदर्शनास आले नाही किंवा कोणाची तक्रारही अली नसल्याचे सांगत लेखी तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे या घटनेचा  व्हिडीओही  व्हायरल झाला आहे तरीही पोलीस आम्हाला काही माहित नसल्याचे सांगत आहेत. यावर बोलताना समस्तीपूरचे एसपी हृदयकांत यांनी विभूतीपूर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. एसपींनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तरुणावर थुंकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. त्याची चौकशी केली असता हा व्हिडीओ विभूतीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चखाबीब गावातील असल्याचे निष्पन्न झाले.

हे संपूर्ण प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचे एसपींनी सांगितले. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वतीने पोलिस ठाण्यात कोणतीही लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे चौकीदाराच्या जबानीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओवरून ओळख पटवून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!