Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : मातोश्रीवर मॅरेथॉन बैठक , उद्धव ठाकरे यांचा आज फेसबुकवरून संवाद …

Spread the love

मुंबई  : भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या नावासह त्यांच्या पक्षाचे चिन्हही तूर्त  गोठवले आहे. त्यामुळे  शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी ‘कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा संदेश  दिला आहे. शिवाय उद्धव ठाकरे हे फेसबुकच्या माध्यमातून आज संध्याकाळी ६ वाजता जनतेशी संवाद सुद्धा साधणार आहे.


‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीला विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, सुभाष देसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर भास्कर जाधव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. भास्कर जाधव म्हणाले कि , आम्ही सगळे जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटलो आहे. जो काही निर्णय झाला आहे. जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे. परंतु, माझ्या सूचना आहेत कि, आपल्या लोकांनी  संयम बाळगावा. उद्धव ठाकरे लवकरच जनतेशी संवाद साधणार आहे. निवडणूक आयोगाने आमचे सर्व मार्ग बंद केले. जनतेच्या न्यायालयात आमचा फैसला होईल, निवडणुकांमध्ये जनता न्याय देईल, जनतेच्या मनात प्रचंड असंतोष असल्याचं जाणवतंय, अनेक शिवसैनिकांना रडू आवरत नाही. जनतेला संयम बाळगायला सांगा असा उद्धव ठाकरे यांचा संदेश आहे.

पर्यायी चिन्ह आणि पक्षाचं पर्यायी नाव निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. पर्यायी चिन्ह पोहोचवण्यासाठी आज दोन पर्यंतची मुदत होती आमच्याकडून चिन्ह पोहचवण्याचे काम झाले आहे. बघू निवडणूक आयोगाचा निर्णय काय येतो, असेही जाधव म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र

शिवसेना पक्ष नसून कुटुंब आहे. हे दसरा मेळाव्याला सर्वांनी पाहिलं. राजकीय वल्गना करून आपल्या आईला विकलं. आमच्यातलेच एकनाथ शिंदे यांनी आम्हाला या उंबरठ्यावर आणलं त्यांच्याबद्दल चीड जनतेच्या मनात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला आशा पद्धतीने घेरलं. चड्डा नड्डा असे वाचाळवीर येऊन बोलत होते, शिवसेना संपवणार नड्डा साहेब बोलले पण बाळासाहेबांची चिंगारी आणि उद्धव ठाकरे यांना मात्र तुम्ही संपवू शकत नाही, असे  किशोरी पेडणेकर यांनी ठणकावून सांगितलं.


लोकशाहीमध्ये जनतेची चीड दिसून येईल. घरातल्या घर भेदीला घेऊन जे स्वप्न तुम्ही बघत आहात ते पूर्ण होणार नाही. त्यांच्या बापाचे नाव घ्यायला कोणीचं अटकाव करू शकणार नाही, ते शिवसेनाप्रमुख होते आणि आहेत, असंही पेडणेकर म्हणाल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!