Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : लोकसंख्या असमतोल , असदुद्दीन ओवेसी यांचे मोहन भागवत यांना उत्तर …

Spread the love

नवी दिल्ली : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ‘मुस्लिम लोकसंख्येवरून’ RSS प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. ओवेसी म्हणाले की, मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाही, तर कमी होत आहे. ते म्हणाले की, मोहन भागवत आकड्यांचा आधार घेऊन बोलत नाहीत.


मोहन भागवत यांनी नुकतेच नागपुरात सांगितले की, भारताने सर्व सामाजिक गटांना समान रीतीने लागू होणारे सर्वसमावेशक लोकसंख्या नियंत्रण धोरण तयार केले पाहिजे. त्याच वेळी, त्यांनी लोकसंख्येच्या ‘असंतुलन’चा मुद्दा उपस्थित केला आणि सांगितले की लोकसंख्येच्या असंतुलनामुळे भौगोलिक सीमांमध्ये बदल होतो. आरएसएस प्रमुख म्हणाले होते की समुदाय आधारित लोकसंख्या असमतोल हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.

या पार्श्वभूमीवर न्यूज एजन्सी एएनआयने असदुद्दीन ओवेसी यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि,  ‘मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाहीये. विनाकारण टेन्शन घेऊ नका. मुस्लिम लोकसंख्या कमी होत आहे. मला एका वाहिनीवर चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. मी तिथे म्हणालो की, भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या आई-वडिलांपासून किती मुलं झाली आहेत ते सांगेन. तेव्हा मला सांगण्यात आले की , तुम्ही बरोबर आहेत.

ओवेसी म्हणाले कि , उलट  मुस्लिमांची लोकसंख्या कमी होत आहे. सर्वाधिक TFR (एकूण प्रजनन दर) मुस्लिमांमध्ये घसरत आहे. एका मुलाच्या जन्मातील अंतर मुस्लिमांमध्ये सर्वाधिक आहे. बहुतेक  मुस्लिम कंडोम अधिक प्रमाणात वापरात आहेत. पण मोहन भागवत यावर बोलणार नाहीत. मोहन भागवत साहेब, लोकसंख्या कुठे वाढतेय, तुम्ही आकडे सांगा. पण ते आकडेवारीवर बोलणार नाहीत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!