Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RSSNewsUpdate : चर्चेतली बातमी : असे काय ? बोलले मोहन भागवत कि , ज्यांच्या वक्तव्यावर होते आहे चर्चा …!!

Spread the love

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये भारतातील जाती आणिचातुर्वर्ण व्यवस्थेवर जे भाष्य केले त्यावरून प्रतिक्रिया येत आहेत. नागपुरातील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना भागवत यांनी, “ब्राह्मण हा जन्माने नव्हे तर कर्माने होत असतो. हे सर्वच धर्मशास्त्रात नमूद असले तरी मधल्या काळात चातुवर्ण्य व्यवस्थेची चौकट घट्ट झाली आणि आपल्याकडून माणसाला मान खाली घालायला लावणारे कृत्य घडले. त्यामुळे आता आपल्याला त्याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे प्रतिपादन केले.


विदर्भ संशोधन मंडळाच्यावतीने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी वा.वि. मिराशी सभागृहात पार पडला. यावेळी डॉ. भागवत बोलत होते. ‘वज्रसूची-टंक’ या ग्रंथावर भाष्य करताना डॉ. भागवत म्हणाले, या पुस्तकात ब्राह्मण कोण, यावर दोन्ही बाजूंनी तर्क मांडले आहेत. ते संशोधनाच्यादृष्टीने उच्च पातळीचे आहेत. पण, आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्यांच्या कर्मामुळे, गुणामुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढय़ांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली. हा काळ चंद्रगुप्त साम्राज्याचा होता.

वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झाला आहे. कोणालाही विषमता नको. हीच सर्वाच्या मनातील गोष्ट डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करित आहोत, जी जात नाही, ती जात.. हे विधान आजपर्यंत अनेकदा अनेक चर्चासत्रांमधून, भाषणांमधून आणि पुस्तकांमधून आपल्या वाचनात, ऐकण्यात आणि चर्चेत आलं आहे. मात्र, आता ही जातव्यवस्था घालवायला हवी, असेही भागवत यावेळी बोलताना म्हणाले.

भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती…

आपल्या भाषणात भागवत पुढे म्हणाले कि , ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होते, त्या गोष्टींचं समूळ उच्चाटन आता करायला हवं. या पुस्तकासंदर्भात बोलताना भागवत म्हणाले, “आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली”.

“सामाजिक एकता भारतीय संस्कृतीचा भाग होती”

दरम्यान, यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी कधीकाळी भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेली सामाजिक एकता काळाच्या ओघात मागे पडल्याची खंत व्यक्त केली. “सामाजिक एकता हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता. पण नंतर त्याचा विसर पडला आणि त्यामुळे समाजाला गंभीर परिणाम भोगावे लागले”, असं ते म्हणाले. “जर आज कुणी जातीव्यवस्था किंवा वर्णव्यवस्थेविषयी विचारणा केली, तर ‘तो आता भूतकाळ आहे, तो आपण विसरायला हवा’, असंच उत्तर येईल”, असंही मोहन भागवत यांनी नमूद केलं.


“ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!