HingoliNewsUpdate : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी अॅटो चालकास जन्मठेपेची शिक्षा…

हिंगोली/प्रभाकर नांगरे : हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये २०१७ साली पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून ऑटो चालकाविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता याप्रकरणी हिंगोली जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.जी कांबळे यांनी दोषी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्याची अधिक माहिती अशी कि , हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिनांक ०८/१२/२०१७ रोजी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कोचिंग क्लासेस करून तिच्या मैत्रिणी सोबत घरी परत जात असताना बायपास रोड हिंगोली येथुन ऑटो चालक असेफ व त्याच्या मित्राने अल्पवयीन मुलीच्या हाताला व पायाला धरून ऑटोत टाकून देवाळा-कोथळज शिवारात नेऊन आरोपी असेफ ने चाकूचा धाक दाखवून या परिसरातील माळराणात पिडित अल्पवयीन मुली सोबत जबरदस्ती व तिच्यावर जबरी संभोग केला होता या घटनेची माहिती कोणाला सांगितली तर तुला जीवे मारीन अशी धमकीहि यावेळी आरोपीने पिडीतेस दिली होती या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादिवरून सदरील प्रकरणाचा तपास केल्यानंतर तपास आधीकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा प्राथमिक तपासणी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एस.एस.केंद्रे यांनी सदर गुन्ह्याचा तपासासाठी पोलीस हवालदार राहुल गोटरे यांनी हि मदतनीस म्हणून काम केले होते. या प्रकरणी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दोषारोपपत्र दाखल केले होते
जिल्हा व सत्र न्यायालयात हे प्रकरण विशेष बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार जलदगतीने चालविण्यात आले सदरील प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.जे.कांबळे यांच्यासमोर चालु होते दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेत सदरील प्रकरणातील आरोपीस विविध कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे या प्रकरणी सरकारी पक्षा तर्फे श्रीमती सविता.एस.देशमुख यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काम पाहिले बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे आशा घटनांना आळा बसेल व गुन्हेगारांमध्ये वचक बसेल या निकालामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केल्या जात आहे.