IndiaNewsUpdate : मेरे देशमे : चोरीच्या संशयावरून दलित मुलाला विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण…

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील औरैया येथील दलित विद्यार्थ्यांच्या मारहाणीमुळे झालेल्या मृत्यूची प्रकरणे घडलेली असतानाच कर्नाटकात एका दलित मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मुलाने चोरी केल्याचा आरोप आहे, त्यामुळे दहा तरुणांनी त्याला आधी विजेच्या खांबाला बांधले आणि नंतर बेदम मारहाण केली.  दरम्यान या तरुणांनी आपल्यालाही मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलाच्या आईने केला आहे.  या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


IndiaNewsUpdate : पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मुलगा आणि त्याच्या आईला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. ही घटना २९ सप्टेंबरची आहे. बेंगळुरूजवळ झालेल्या या घटनेत मारहाण झालेल्या मुलाच्या आईने आरोप केला आहे की, मुलांसोबत खेळताना त्याने कानातले चोरल्याचा संशय असल्याने आरोपींनी तिच्या मुलाला मारहाण करीत आमच्या जातीतील लोकांना संपवण्याची धमकीही आरोपींनी दिली आहे.

Advertisements

दरम्यान या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Advertisements
Advertisements

गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील औरैया येथे असेच एक प्रकरण समोर आले होते. पीडित विद्यार्थ्याला एक शब्द नीट उच्चारता येत नसल्याने त्याच्या तथाकथित उच्चवर्णीय शिक्षकाने रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोमवारी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

IndiaNewsUpdate


#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

 

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

For current updates join

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide

https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

आपलं सरकार

Click to listen highlighted text!