Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : नवरात्रोत्सवनिमित्त हिंगोली पोलीसांकडून चोख पोलीस बंदोबस्त….

Spread the love

पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी घेतला बंदोबस्ताचा आढावा

हिंगोली / प्रभाकर नांगरे : दुर्गादेवी नवरात्रोत्सव करीता पोलीस अधीक्षक  एम . राकेश कलासागर यांचे मार्गदर्शनात संपुर्ण जिल्हा पोलीस दलातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे . पोलीस अधीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समितीची बैठक घेण्यात येणार आहेत . तसेच सर्व वरीष्ठ अधिकारी यांच्याकडून जिल्हयातील सर्वच तालुकास्तरीय मोठया शहरामध्ये मंडळाच्या बैठका व विसर्जन मार्ग पाहणी केली जाणार आहे .


सदर दुर्गादेवी नवरात्रोत्सव करीता पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त देखरेख अधिकारी अपर पोलीस अधीक्षक त्यांचे सोबत ०१ सहायक पोलीस अधीक्षक , ०३ उपविभागीय पोलीस अधिकारी , पोलीस निरीक्षक , सहा.पोलीस निरीक्षक , पोलीस उपनिरीक्षक असे ४४ पोलीस अधिकारी , ७२७ पोलीस अंमलदार , ०१ एस.आर.पी.एफ प्लाटुन , आर.सी.पी .०२ पथक , व ६०० होमगार्ड अशा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे .

जिल्हयातील सर्वच पोलीस स्टेशन स्तरावर पोलीसांकडुन दंगा नियंत्रण सराव व पथसंचलन ( रूटमार्च ) घेण्यात येणार असून  जिल्हाधिकारी हिंगोली यांचे आदेशाने नमुद काळात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याकरीता सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणुक करण्यात आली आहे . पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बंदोबस्त आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना  देऊन  मार्गदर्शन केले .

सदर बैठकीला अपर पोलीस अधीक्षक  यशवंत काळे , सहा . पोलीस अधीक्षक   यतीश देशमुख , उपविभागीय पोलीस कारी हिं . ग्रामीण  विवेकानंद वाखारे , उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत  किशोर कांबळे , प्र . पोलीस उपाअधीक्षक गृह  सोनाजी आम्ले , स्थानिक गुन्हे शाखा पो.नि.श्री . उदय खंडेराय , जिल्हा विशेष शाखा पो.नि.श्री . शिवाजी गुरमे , सर्व १३ हि पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व सर्व शाखेचे प्रभारी उपस्थित होते .

यावेळी सर्वांनी दुर्गादेवी व शारदादेवी मंडळ स्थापना  करतांना पोलीस विभागाकडुन ऑनलाईन परवानगी व ईतर विभागांकडून  आवश्यक परवानगी न चुकता घ्यावी . सदर उत्सव काळात प्रतिबंधीत डी.जे. चा वापर न करता समाज उपयोगी व आरोग्याशी संबधीत तसेच विदयार्थी करीता विवीधी स्पर्धा इ . चे आयोजन करावे . तसेच पोलीस व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे व नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा करावे असे आवाहन करण्यात येत आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!