Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : देश सोडून पळून जाणाऱ्या उद्योगपतींच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांनी मोदींना दिली क्लीन चिट …

Spread the love

कोलकाता : तपास यंत्रणांच्या रडारखाली देश सोडून पळून जाणाऱ्या उद्योगपतींच्या मुद्द्यावरून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषमुक्त केले आहे. दरम्यान हा ठपका त्यांनी इतर भाजप नेत्यांवर ठेवला जे या षडयंत्राचा भाग आहेत. तर सीबीआय  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल देते असे ममतांनी म्हटले आहे.


“जे व्यावसायिक देशातून पळून जात आहेत. ते ईडी (अंमलबजावणी संचालनालय) आणि सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) च्या भीतीमुळे आणि गैरवापरामुळे पळत आहेत. मोदी याला जबाबदार नसल्याचा आपणास विश्वास असल्याचेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

“तुमच्यापैकी बर्‍याच जणांना माहित नाही की CBI आता PMO (पंतप्रधान कार्यालय) ला अहवाल देत नाही. त्यांच्याकडून गृह मंत्रालयाला अहवाल दिला जातो. भाजपचे काही नेते याबाबत कट रचत रचतात आणि ते अनेकदा निजाम पॅलेसला भेट देतात,” मुख्यमंत्री म्हणाले.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या कि, “मी पंतप्रधानांना आदराने सल्ला देते. तुमचे नेते  तुम्हाला बंगालसाठी पैसे देण्यापासून रोखण्याचा सल्ला देतात. ते तुम्हाला चित्ता विकत घेणे बंद करण्याचा सल्ला का देत नाहीत? मी काल पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या, आणि त्यांना पक्ष आणि सरकारमध्ये सरमिसळ करू नका. दरम्यान पेगाससच्या माध्यमातून तुम्ही देशावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, प्रत्येकाचा फोन ट्रॅक केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेत पस केला हा ठराव …

केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केल्याच्या आरोपाला समर्थन देत सीबीआय, ईडी आणि इतर फेडरल एजन्सींच्या विरोधात ठराव मंजूर केला आहे. केंद्रीय यंत्रणांच्या अतिरेकाविरोधातील ठराव १८९ मतांनी मंजूर झाला, तर ६४ आमदारांनी विरोधात मतदान केले.  त्यांनी जाहीर केले की हा ठराव कोणाचा निषेध करण्यासाठी नाही तर तो “न्यायपूर्ण” आहे.

दरम्यान सुवेंदू अधिकारी यांची खिल्ली उडवत ममता बॅनर्जी म्हणाल्या की , त्यांचा मित्र शत्रू क्रमांक एक झाला आणि राज्यातील भाजपच्या सर्वात उंच नेता बनला. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणात वाँटेड असलेल्या तुमच्या नेत्याच्या घरावर किती छापे टाकण्यात आले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ममता बॅनर्जींच्या या विधानावर त्यांचे जुने सहकारी आणि आता भाजपचे नेते अधिकारी यांनी टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे बोट दाखवत म्हटले की, “पीएम मोदींचे कौतुक करून त्या आपल्या पुतण्याला वाचवू शकत नाहीत.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!