Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन

Spread the love

नवी दिल्ली : द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन झाले आहे. ९९ वर्षांचे स्वरूपानंद सरस्वती हे दीर्घकाळ आजारी होते. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील परमहंसी गंगा आश्रमात त्यांनी आज दुपारी साडेतीन वाजता मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथील परमहंसी गंगा आश्रमात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाल्याचे पंतप्रधानांनी लिहिले असून  या दु:खाच्या काळात त्यांच्या अनुयायांप्रती मी शोक व्यक्त करीत असल्याचे म्हटले आहे.


मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. स्वामी स्वरूपानंद यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी दीर्घ कायदेशीर लढा दिला होता. स्वातंत्र्यलढ्यात ते तुरुंगातही गेले होते.

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म २ सप्टेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव धनपती उपाध्याय आणि आईचे नाव गिरिजा देवी होते. आई-वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय ठेवले. स्वामी स्वरूपानंद यांनी वयाच्या नवव्या वर्षी घर सोडले आणि धार्मिक यात्रा सुरू केली. या दरम्यान ते काशीला पोहोचले जेथे त्यांनी स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून वेद आणि धर्मग्रंथाची शिक्षा घेतली.

पंतप्रधान मोदींसह प्रियांका गांधी यांचीही श्रद्धांजली

शंकराचार्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे, “द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. या दु:खाच्या काळात त्यांच्या अनुयायांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.” असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. याशिवाय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करून स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांच्या निधनाची दु:खद बातमी मिळाली. सनातन संस्कृती आणि धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. मी त्यांच्या अनुयायांप्रती शोक व्यक्त करतो. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो.

दरम्यान या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लिहिले आहे की,  भगवान शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या पश्चिम अम्नया श्री शारदापीठाचे पूज्य शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनाची माहिती अत्यंत दुःखद आहे. पूज्य स्वामीजी हे सनातन धर्माचे शलाका  पुरुष आणि संन्यास परंपरेचे सूर्य होते.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!