Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : दिल्लीसह देशभरात दारू प्रकरणात ३० ठिकाणी छापे…

Spread the love

नवी दिल्ली : दिल्लीतील दारू प्रकरणात  ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या ३० ठिकाणी छापे टाकल्याच्या वृत्त आहे. आज दिल्ली, मुंबईसह ७ वेगवेगळ्या शहरांमध्ये छापे टाकण्यात येत आहेत. काही मद्यविक्रेते आणि उत्पादन शुल्कच्या माजी अधिकाऱ्यांच्या घरांवर हे छापे टाकण्यात येत आहेत. विशेषतः सीबीआयच्या एफआयआरमध्ये ज्या लोकांची नावे आहेत त्यांच्यावर छापे टाकले जात आहेत.


या एफआयआरमध्ये मनीष सिसोदिया यांचे नाव असले तरी त्यांच्याकडे मात्र पुन्हा छापेमारी झाल्याचे वृत्त नाही. मनीष सिसोदिया यांनी ईडीच्या छाप्याबाबत वक्तव्य केले आहे की, यापूर्वी सीबीआयच्या छाप्यांमध्ये त्यांना काहीही मिळाले नाही. आणि आता ईडी छापे टाकेल, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. अरविंद केजरीवाल जी कामे करीत  आहेत ती कामे  थांबवण्याचे काम केले जात आहे, पण ते ते कोणीही थांबवू शकणार नाहीत. मग त्यासाठी सीबीआय वापरा, कि  ईडी वापरा. ‘आप’ला रोखता येणार नाही, शिक्षणाचे काम थांबवता येणार नाही.

दरम्यान दिल्लीतील दारू धोरणावरून भाजप आणि आप यांच्यात आधीच भांडण सुरू आहे. एकीकडे ‘आप’ने नवीन दारू धोरणात भरपूर पैसा कमावल्याचा आरोप भाजप करत आहे. त्याचवेळी ‘आप’ने भाजपचा हा आरोप बकवास असल्याचे म्हटले आहे. असे असूनही, विरोधी पक्ष भाजप आम आदमी पार्टी (आप) सरकारच्या दारू धोरणावर आक्रमक आहे. हे धोरण मागे घेण्यात आले असले, तरी दोन्ही पक्षांमध्ये राजकीय संघर्ष सुरूच आहे. आदल्या दिवशी भाजपने केजरीवाल यांच्या दारू धोरणात कमिशनचा आरोप करत स्टिंग जारी केले आहे.

यावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पलटवार करत म्हटले की, भाजप घोटाळा झाल्याची ओरड अनेक दिवसांपासून करत आहे. कधी १३०० कोटी, कधी ८००० कोटी, कधी ५००, कधी १४४ कोटी, कधी ३० कोटी सांगितले जाते. त्यानंतर सीबीआयकडे एफआयआर दाखल झाल्यानंतर सीबीआयने दोन्ही कंपन्यांमधील पांढरा व्यवहार बळजबरीने दुरून खेचून लादण्याचा प्रयत्न केला, तोही सूत्रांच्या हवाल्याने. त्या आधारे माझ्या घरावर छापा टाकला असता त्यात काहीही आढळले नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!